Kareena Kapoor started crying On Set : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आहे. करण बऱ्याचवेळा चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या खासगी गोष्टीवर सगळ्यांसमोर चर्चा करताना दिसतो. तो या सगळ्या गोष्टींवर चर्चा त्याच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) मध्ये करतो. दरम्यान, करणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो अभिनेत्री करीना कपूर खानशी (Kareena Kapoor Khan) संबंधित एक किस्सा सांगताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, करण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 13' च्या सेटवर असल्याचे दिसत आहे आणि करीना कपूर खानशी संबंधित एक किस्सा सांगत आह. हा किस्सा करीनाच्या अभिनय आणि शूट दरम्यानचा आहे. या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला, होस्ट आदित्य नारायण दिसत आहे, जो करण जोहरला विचारतो, 'तुम्ही तुमच्या चित्रपटातील कोणत्याही सीनमध्ये ओव्हरऍक्टिंग करणाऱ्या एखाद्या अभिनेत्याबद्दल सांगू शकता का?' यावर करण म्हणतो, करीना कपूरबद्दल बोलूया, 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाच्या एका दृश्यात करीना वेड्यासारखी रडायला लागली आणि तिला हे करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, असे करणने सांगितले.
2001 साली प्रदर्शित झालेल्या 'कभी खुशी कभी गम' या सुपरहिट चित्रपटाशी संबंधित आहे असे सांगत करण बोलतो, 'चित्रपटाच्या शेवटच्या सीनचं शूटिंग आम्ही करत होतो. शाहरुख आणि जया बच्चन यांच्या भेटीचा हा सीन होता. या सीनमध्ये करीना आणि काजोल यांनाही भावूक व्हायचे होते, जे संपूर्ण चित्रपटात हसताना आणि विनोद करताना दिसतात. करीना माझ्याजवळ आली आणि मला विचारू लागली की मलाही आज एक इमोशनल सीन करायचा आहे, तर मला आज रडावे लागेल का? मी म्हणालो, हो, थोडं इमोशनल व्हायला हवं.'
करण पुढे म्हणतो, 'सीनमध्ये शाहरुख-जया बच्चन अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्यानंतर रडू लागतात आणि हे पाहून हृतिक रोशनही भावूक होतो. तो मागे वळताच करीनाला त्याला सांभाळावे लागते. तिला हृतिकच्या खांद्यावर हात ठेवावा लागतो. पण, शूट सुरू होताच करीना अचानक जोरजोरात रडू लागली. करीनाला असे वेड्यासारखे रडताना पाहून मला आश्चर्य झाले आणि हृतिकही चकित झाला. पण, ती तिच्या भूमिकेत होती आणि ती सतत रडत होती.
हेही वाचा : Amitabh Bachchan आणि ऐश्वर्या रायच्या समोर आला Ex Boyfriend अन्..., एकच खळबळ
करीनाची ही ओव्हर अॅक्टिंग पाहून मी ओरडलो, 'बेबो क्या हुआ तुमको.' तर ती म्हणाली की, 'आपने ही तो कहा था की इमोशनल होना है', हे ऐकून मला प्रचंड हसू आले.' मी म्हणालो, 'हो पण असं करायचं नव्हतं. मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये करीना कपूरची ही ओव्हर अॅक्टिंग पहिली नव्हती.