चारूसोबत माझा कोणताही संबंध नाही; करण मेहरानं राजीवच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया

करण मेहरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Nov 5, 2022, 09:09 AM IST
चारूसोबत माझा कोणताही संबंध नाही; करण मेहरानं राजीवच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Sushmita Sen's Brother Rajeev Sen) यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. गरोदर असताना राजीवनं तिची फसवणूक केली असा गंभीर आरोप चारूनं केला होता. त्यानंतर राजीवनं चारू अभिनेता करण मेहरासोबत रिलेशनशिपमध्ये होती असा आरोप केला होता. या आरोपावर आता करण मेहरानं वक्तव्य केलं आहे. इतकंच काय तर त्यानं राजीवला खडसावलं आहे. 

राजीवला खडसावत करण मेहरा काय म्हणाला...

राजीवनं केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत करण मेहरा' टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'राजीव कोणत्या रोमान्सबद्दल बोलत आहे? चारूशी मी जूनमध्ये एका कार्यक्रमात बोललो होतो. त्यानंतर, आम्ही आजपर्यंत कधीही कनेक्ट झालो नाही. या घटनेपूर्वी मी चारूला 10 वर्षांपूर्वी भेटलो होतो. निशा रावल प्रकरणानंतर मी दिल्लीला गेलो आणि राजीव सेननं माझ्यावर असे आरोप केले. हे फक्त भयानक आहे.'

तो पुढे असेही म्हणाला की 'त्याला राजीव सेनशी संपर्क साधायचा नाही. माझ्याकडे त्याचा नंबर नाही आणि मला नकोही आहे. मी त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे.

हेही वाचा : ...म्हणून आई संसदेत जाते; जया बच्चन यांच्याविषयी अभिषेकचा मोठा खुलासा

काय म्हणाला होता राजीव सेन 

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत राजीवनं चारूच्या सर्व आरोपांचे खंडन केले. चारूचे टीव्ही अभिनेता करण मेहरासोबत अफेअर असल्याचा धक्कादायक खुलासा राजीवनं यावेळी केला. त्यानं केलेल्या या आरोपाची पुष्टी करण्यासाठी राजीवनं चारूची आई नीलम असोपा यांची एक व्हॉइस नोट देखील सादर केली. राजीवने सांगितले की, चारूने करण मेहरासोबत रोमँटिक रील बनवलं होतं. राजीवला चारू आणि करणच्या रोमान्सचे सत्य अभिनेत्रीच्या आईने सांगितले.

याविषयी सांगताना राजीव म्हणाला, 'चारू आणि करण यांच्यात काय चाललं आहे याची मला कल्पना नव्हती. चारूनं माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला, पण ती स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आहे. आपण कोणत्या जगात राहतो? चारूला ट्रस्ट इशू होते, मला नाही. चारूसारख्या व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही. 'चारूला कळत नाही आहे ती काय करते. तिच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर तिनं गमावला आहे. चारूचा Ego खूप वाढला आहे. याशिवाय राजीवनं चारूने केलेले मारहाणीचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे '

चारू आणि राजीव 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही एकत्र कधीच सुखी नव्हते. त्यांनी या आधी एकदा घटस्फोट घेण्याचा निर्णय  नाते पुन्हा पुन्हा तुटायचे आणि मग ते एकत्र यायचे. त्यांना 1 वर्षाची मुलगी आहे. चारू आणि राजीवचे नाते अशा प्रकारे तुटल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. (rajeev sen slams charu asopa allegations of cheating in pregnancy reveals she had affair with karan mehra)