जुना वाद विसरून आता हा अभिनेता करण जोहरच्या शोमध्ये

पत्नीसोबत अनेक गुपित उघडणार 

जुना वाद विसरून आता हा अभिनेता करण जोहरच्या शोमध्ये  title=

मुंबई : करण जोहरचा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'. या शोचा सहावा सिझन सुरू असून या शोची असंख्य चाहते वाट बघत असतात. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकार आले आहेत. सहाव्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दोन लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री आल्या. त्याम्हणजे आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण. या दोघींनी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खूप खुलासे केले. 

आता अशी माहिती मिळत आहे की, करण जोहरच्या या चॅट शोमध्ये लवकरच अजय देवगन पाहुणा म्हणून येणार आहे. दिवाळीच्या नंतर हा खास एपिसोड शूट होऊ शकतो. या शोमध्ये अजय देवगन एकटा नाही तर पत्नी काजोलसोबत येणार आहे. 

आपल्याला माहितच असेल अजय देवगन आणि करण जोहर यांच्यातील नातं काही चांगल नाही. पण आता बहुदा हे नातं सुधारलं असेल. या दोघांनी देखील काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला आहे. करण जोहरचा हा कॉफी विथ करण हा शो 2004 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. त्यानंतर या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली.