Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या सोशल मीडियापोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कपिल शर्माने आता त्याच्या प्रवासातील धक्कादायक अनुभवाची एक पोस्ट शेअर केली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Flight) फटकारले असून त्यांच्या सर्व्हिसबद्दल तीन ट्विट केले आहेत. कपिलने या पोस्टमध्ये दोन व्हिडिओही शेअर केले आहेत. कपिल शर्माने पोस्टच्या माध्यमातून इंडिगो फ्लाइटवर आपला संताप व्यक्त केला आहे. इंडिगोच्या या फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
बुधवारीही कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर संतप्त पोस्ट केली होती. विमानाला उशीर झाल्यामुळे कपिल शर्मा संतापला आहे. कपिलने एक पोस्ट करत इंडिगोच्या विमानाच्या विलंबावर संताप व्यक्त केला. कपिल शर्माने या घटनेचे काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत ज्यात हतबल विमानतळ अधिकारी त्रासलेल्या प्रवाशांच्या गर्दीसोबत दिसत आहेत. तीन पोस्टच्या माध्यमातून कपिल शर्माने तुमच्या विमानातू कोणी पुन्हा प्रवास करेल असाही सवाल इंडिगोला विचारला आहे.
कपिल शर्माने इंडिगोबाबत एका पाठोपाठ तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये कपिल शर्माने, 'प्रिय इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला 50 मिनिटे थांबायला लावले आणि आता तुमची टीम म्हणतेय की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. हे खरच आहे का? आम्ही 8 वाजता टेक ऑफ करणार होतो आणि आता 9.20 झाले आहेत, अजूनही कॉकपिटमध्ये पायलट नाही. तुम्हाला काय वाटते, हे 180 प्रवासी पुन्हा इंडिगोने प्रवास करतील का? कधीच नाही.... निर्लज्ज', असे म्हटलं आहे.
Dear @IndiGo6E first you made us wait in the bus for 50 minz, and now your team is saying pilot is stuck in traffic, what ? Really ? we supposed to take off by 8 pm n it’s 9:20, still there is no pilot in cockpit, do you think these 180 passengers will fly in indigo again ? Never…
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023
यानंतर कपिल शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशांना विमानातून उतरवले जात आहे. या व्हिडिओसोबत कपिलने कॅप्शनमध्ये, 'आता सर्व प्रवाशांना उतरवले जात आहे आणि ते सांगत आहेत की आता ते आम्हाला दुसऱ्या विमानाने पाठवले जाईल... पण सुरक्षा तपासणीसाठी आम्हाला पुन्हा टर्मिनलवर पाठवले जात आहे,' असे म्हटलं आहे.
कपिलने त्याच्या तिसऱ्या पोस्टमध्ये आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक इंडिगोच्या कर्मचार्यांशी बोलताना दिसत आहेत. तर काही लोक थोडे रागावलेलेही दिसत आहेत. 'इंडिगोच्या खोट्या बोलण्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.. प्रवाशांच्या यादीत काही वयस्कर लोक आहेत.. काही व्हील चेअरवर आहेत. इंडिगोची लाज वाटत आहे, असे कॅप्शन कपिलने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, याआधी कपिलने सोशल मीडियावर अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकेकाळी कपिल शर्माच्या पोस्टने चांगलाच गदारोळ उडाला होता. कपिल शर्मा जेव्हाही कोणत्याही व्यवस्थेवर नाराज असतो तेव्हा तो सोशल मीडियावर व्यक्त होता. कपिल शर्माने एकदा टॅक्ससंदर्भात एक ट्विट केले होते. ज्यासाठी त्याला नंतर माफी मागावी लागली. यावेळी इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्यामुळे कपिल शर्मा संतापला आहे. मात्र आता नेटकऱ्यांनी त्यालाच फैलावर घेतलं आहे. कपिलच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कपिल जी, तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान लोकांना जास्त वेळ वॉशरूम वापरण्याची परवानगी नाही. कृपया शांत राहा, असे म्हटलं आहे.
दुसऱ्या एका युजरने, तू एक सुपरस्टार आहेस. लोक तुमचे अनुसरण करतात. नवीन श्रीमंत झाल्यासारखे वागत आहात. तुम्ही कॉमेडी नाईटमध्ये जसे करता तसे तुम्ही सगळीकडे करू शकत नाही. लक्षात ठेवा, असे म्हटलं आहे.