कोरोनामुळे प्रसिद्धीत आलेली सेलिब्रिटी, डेल्टा पसण्याआधीच अडकतेय विवाहबंधनात

कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.

Updated: Mar 14, 2022, 03:01 PM IST
  कोरोनामुळे प्रसिद्धीत आलेली सेलिब्रिटी, डेल्टा पसण्याआधीच अडकतेय विवाहबंधनात title=

मुंबई : बेबी डॉल सिंगर कनिका कपूर लवकरच लग्न करणार आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली कनिका कपूर तिच्या गाण्यांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.

नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, कनिका कपूर लवकरच NRI उद्योगपती गौतमसोबत लग्न करणार आहे. गायिकेचा लग्नसोहळा लंडनमध्ये होणार आहेत.

एका रिपोर्टनुसार, कनिका कपूर आणि गौतम गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून लग्न करण्याचा विचार करत होते. कनिका कपूरच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना सुद्धा धक्का बसला आहे. 

रिपोर्टनुसार, जेव्हा कनिका कपूरला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने यावर काहीही सांगितले नाही आणि या बातम्यांचे खंडनही केले नाही. यावर कनिका कपूर म्हणाली, 'सॉरी, नो कमेंट्स.'

कोरोना काळात ही बॉलिवूड सेलिब्रिटी खूपच चर्चेत आली होती.  जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाची सुरुवात झाली होती. तेव्हा कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं होतं.

तिने काही पार्टींना देखील हजेरी लावली होती. ज्यात अनेक सेलिब्रिटी हजर होते. त्यामुळे कनिका नंतर इतर कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे सगळीकडे कनिकाच्या कोरोना रिपोर्टबाबतची बातमी वेगात पसरत होती.

Hot Kanika Kapoor Photo Gallery - Sab Ka Mann

कनिका कपूरचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न NRI उद्योगपती राज चंडौक यांच्याशी झाले होते. तो लंडनचा रहिवासी होता, पण राज आणि कनिकाने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.