'लॉक अप'च्या सेटवर का रडली कंगना? पाहा व्हिडीओ

अभिनेत्री कंगना रनौतच्या 'लॉक अप' या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. नुकतच या शोने 300 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. मात्र शोमध्ये एका प्रसंगानंतर कंगनाला रडू कोसळलं

Updated: Apr 18, 2022, 11:28 AM IST
'लॉक अप'च्या सेटवर का रडली कंगना? पाहा व्हिडीओ title=

मुंबईः  अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉक अप या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. नुकतच या शोने 300 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.  शोमध्ये एक-एक नवे स्पर्धकही वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे प्रवेश करत आहेत.

याव्यतिरिक्त शोमधील स्पर्धक अनेक नवे खुलासे करत असल्याने या शोची रंगतही वाढते आहे. काही दिवसांपूर्वीच मुनव्वर फारूकीने आपण विवाहित असून आपल्याला एक मुलगा असल्याचा खुलासा केला होता. हे समजल्यानंतर सर्वच जण आश्चर्यचकीत झाले होते आणि मुनव्वरने आता अशी गोष्टी सांगितली आहे ती ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत

जजमेंट डेला कंगनाने स्पर्धकांना बचावासाठी एक संधी दिली होती. जो आपले सिक्रेट्स शेअर करेल त्याला बचावाची संधी मिळेल. मात्र मुनव्वरला या संधीचा फायदा घेता आला नाही

आणि तो बजर फेरीतच हरला. मात्र, त्याने कंगनाला विनंती केली की त्याला त्याच्या आयुष्यातील एक काळी बाजू सांगायची आहे. कंगनानेही त्याला ती गोष्ट सांगण्याची संधी दिली. मुनव्वरने ती  गोष्ट सांगताच सर्वांचे डोळे पाणावले आणि वातावरण भावुक झालं.

2007मध्ये आपल्या आईने ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा मुनव्वरने केला. आत्महत्येपूर्वी जवळपास आठवडाभर आईने काहीही खाल्लं नव्हतं.  मुनव्वरने सांगितलं की. आईने

आईने आयुष्यात खूप कष्ट केले होते. वडिलांपासून वेगळं झाल्यानंतर पापड-चकली विकून तिने कुटुंब चालवलं. इतकंच काय पण तिने कोणाकडून तरी 3500 रुपये कर्ज घेतलं होतं ते फेडतानाही तिला लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागले होते

मुनव्वरने हा खुलासा केल्यानंतर कंगनासह घरातील सर्वच स्पर्धकांचे डोळे पाणावले. मुनव्वरला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतं की, आईच्या शेवटच्या दिवसातही तो तिच्यासोबत राहू शकला नाही. हा खुलासा ऐकल्यानंतर कंगनाने मुनव्वरला दिलासा दिला आणि काळं सत्य सर्वांसमोर ठेवल्याबद्दल मुनव्वरचं कौतुकही केलं