घटस्फोटानंतर समंथाच्या शरीरावर नागा चैतन्यची आठवण... आता होतोय पश्चाताप?

आठवणी कधीचं पुसता येत नाहीत..... घटस्फोटानंतर समंथाच्या शरीरावर नागा चैतन्यच्या 'त्या' आठवणी... अभिनेत्रीला आता होतोय पश्चाताप?  

Updated: Apr 18, 2022, 11:17 AM IST
घटस्फोटानंतर समंथाच्या शरीरावर नागा चैतन्यची आठवण... आता होतोय पश्चाताप? title=

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य या दोघांनीही आपल्या वाटा वेगळ्या केल्या. लग्नाला फक्त चार वर्ष झाल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर त्यांच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आता नुकताचं समंथाने आस्क मी एनीथिंग सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. 

यावेळी एका युजरने समंथाला टॅटूबद्दल प्रश्न विचारला. 'टॅटूबद्दल काही आयडिया जो तुला ट्राय करायचा आहे....' यावर समंथा म्हणाली, 'तरुण वयात जर कोणी टॅटू काढत असेल, तर शरीरावर टॅटू बिलकूल काढू नका... ' सध्या अभिनेत्रीचं उत्तर चर्चेत आहे. 

समंथाच्या शरीरावरील टॅटूबद्दल सांगायचं झालं तर,  तिच्या पाठीवर टॅटू आहे ज्यामध्ये YMC म्हणजेच 'Ye Maaya Chesave' असे लिहिले आहे. समंथाच्या पहिल्या सिनेमाचं नाव हे नाव आहे. सिनेमात नागा चैतन्यने देखील मुख्य भूमिका साकारली होती. 2010 मध्ये सिनेमा रिलीज झाला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सामंथाचा आणखी एक टॅटू तिच्या रिब्स आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे. Chay हे नागाचं निकनेम आहे. तिसरा टॅटू तिच्या मनगटावर आहे, ज्यामध्ये बाण चिन्ह बनवले आहे. 

नागा चैतन्यनेही उजव्या हाताच्या मनगटावर असाच टॅटू काढला आहे. नागासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कदाचित सामंथाला शरीरावर टॅटू काढल्याचा पश्चाताप होत असेल.