विकी कतरिनाच्या लग्नावर कंगनाचं सावट?

विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांची सगळ्यांमध्येच खूप उत्सुकता आहे.

Updated: Dec 8, 2021, 04:03 PM IST
विकी कतरिनाच्या लग्नावर कंगनाचं सावट? title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांची सगळ्यानाच उत्सुकता आहे. यादरम्यान सगळ्यांच लक्ष वेधतय कंगना रानौतची इंस्टाग्राम पोस्ट. या पोस्टमध्ये तिने कमी वयाच्या मुलासोबत लग्न करण्यांसाठी खुश असल्याचं सांगितलं आहे. कंगनाने पोस्टमध्ये लिहिलंय की, वय निघून गेल्यावर मुलींचं लग्न होत नाही. तिला खुशी आहे की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीची सक्सेस महिला या सगळ्या प्रथा मोडत आहेत. कंगनाने संपूर्ण पोस्टने विकी कतरिनाचं नाव कुठेचं लिहीलं नाहीये. पण तिच्या पोस्टवरुन असंच दिसतय की, ही पोस्ट तिने कतरिना आणि विकीसाठी शेअर केलीये. कतरिना विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.

कंगनानं असं केलं कपलचं कौतुक 
कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, लहानपणी आम्ही अशा अनेक स्टोरी ऐकल्या आहेत ज्यात श्रीमंत पुरुष खूप लहान मुलींशी लग्न करायचे. स्त्रियांसाठी त्यांच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी होणं ही एक मोठी समस्या म्हणून पाहिली जात होती. वयाने लहान मुलाशी लग्न करणं तर विसरूनच जा. एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांना लग्न करणं अशक्य झालं. श्रीमंत आणि यशस्वी स्त्रिया, भारतीय चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीच्या स्त्रिया या लैंगिकतेचे नियम मोडत आहेत. हे पाहणं चांगलं आहे. 

बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वयात ५ वर्षांचा फरक आहे.  प्रियांका चोप्रानेही आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या निक जोनासशी लग्न केलं आहे. दुसरीकडे, सुष्मिता-रोहमन शॉल, अर्जुन-मलायका यांच्या वयात खूप अंतर आहे आणि चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कंगनाने दिली लग्नाची हिंट
कंगना राणौतनेही यापूर्वी एका कार्यक्रमात तिच्या आयुष्यात कोणीतरी असल्याची हिंट दिली होती. येत्या ५ वर्षांत ती स्वतःला विवाहित आणि सिंगल मदर म्हणून पाहते. असंही तिने सांगितलं. कंगनाच्या आयुष्यात कोण आहे याचा खुलासा तिने केला नाही पण ते लवकरच कळेल असंही तिनं सांगितलं.