कतरिनाच्या गाली लागली विकीच्या नावाची हळद

बॉलिवूड स्टार्स विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची देशभरातील चाहत्यांमध्ये  खूप उत्सुकता आहे. 

Updated: Dec 8, 2021, 03:33 PM IST
कतरिनाच्या गाली लागली विकीच्या नावाची हळद title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्स विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची देशभरातील चाहत्यांमध्ये  खूप उत्सुकता आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत आज म्हणजेच ८ डिसेंबर रोजी या दोघांचा हळदी समारंभ पार पडणार आहे.  विकी कतरिनाचा हळदी सोहळा आज दुपारी १२ वाजता सवाई माधोपूरमध्ये पार पडणार आहे.

हळदी समारंभानंतर सगळ्या पाहुण्यांसाठी जेवणाचं आयोजन केलं आहे. तसंच ईथे रात्रीचं जेवण 8 वाजता सुरु होईल. रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसाठी एक भव्य पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. सगळे विधी आणि पाहुण्यांचं नियोजन अतिशय भव्य पातळीवर करण्यात आलं आहे. यासोबतच प्रत्येकजण या रॉयल वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत आहे पण या लग्नसोहळ्यातील विकी आणि कतरिनाच्या परवानगीनंतरच समोर येतील.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कपलचा विवाह सोहळा ७ डिसेंबर रोजी संगीत सोहळा आणि ८ डिसेंबर मेहंदीने सुरू झाला. विकी आणि कॅटच्या लग्नाचा संगीत सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी आज पंजाबी गायक गुरदास मान देखील आपल्या आवाजाची जादू चालवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबरला विकी आणि कतरिना अखेर सात घेवून लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

कतरिना आणि विकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक पाहुणे सवाई माधोपूरला पोहोचले आहेत. त्याचबरोबर शाहरुख खान, करण जोहर, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांच्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आले आहेत. ताज हॉटेलमध्ये अक्षय कुमारची रूम बुक आहे. मात्र, हे सगळे स्टार्स अद्याप पोहोचलेले नाहीत. ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पोहोचतील अशी अपेक्षा आहे. पाहुण्यांना त्यांचे मोबाईल फोन लग्नाच्या ठिकाणी नेण्यास मनाई आहे आणि लग्नाचे फोटो शेअर न करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.