कंगना रानौतला मोठा झटका, जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'थलायवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Updated: Sep 10, 2021, 07:56 PM IST
कंगना रानौतला मोठा झटका, जाणून घ्या title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'थलायवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. केवळ चाहतेच नाही तर अभिनेत्री स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्साहित होती. हा सिनेमा आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. दरम्यान आता अशा बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे कंगना आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना धक्का बसू शकतो.

तमिळरॉकर्सने चित्रपट केला लीक 
या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहत्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. याचबरोबर, आता 'थलाईवी' रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. कंगना आणि निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. पण आता हा चित्रपट ऑनलाईन लीक होताच त्याचा परिणाम कमाईवरही दिसू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट तमिळ रॉकर्सने लीक केला आहे.

अनेक चॅटिंग अ‍ॅप्सवर शेअर केल्या जात आहेत लिंक्स
हा सिनेमा ऑनलाईन मोफत डाऊनलोड केले जात आहे. चित्रपटाच्या डाउनलोड लिंक अनेक चॅटिंग अॅप्सवर शेअर केल्या जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी लीक झाला आहे.

कंगनाचं खूप कौतुक होत आहे 
तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता, ज्यांनी खूप लहान वयात तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनय कारकीर्द सुरू केली. थोड्याच वेळात, त्यांनी एक उच्च स्थान देखील प्राप्त केलं. दुसरीकडे, चित्रपटातील कंगनाचा अभिनय चांगलाच पसंत केला जात आहे. या चित्रपटासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. हिंदी व्यतिरिक्त, 'थलाईवी' तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज झाला आहे.