Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली 'फर्जी', म्हणते "तो मला मेसेजे करून..."

Kangana Ranaut : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलिया आणि रणबीरवर साधला निशाणा... कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 18, 2023, 06:48 PM IST
Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली 'फर्जी', म्हणते "तो मला मेसेजे करून..." title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. तिने यापूर्वी बॉलिवूडवर अनेकवेळा टीका केली आहे. इतकंच नाही तर घराणेशाहीबद्दल उघडपणे बोलताना दिसते. कोणताही मुद्दा असो, कंगना यावर तिची प्रतिक्रिया देण्यापासून नेहमीच पुढे असते. अलीकडे, तिने अप्रत्यक्षपणे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांच्या नात्याला 'फेक' म्हटलं आहे. त्यांचे लग्न हे 'बनावट' असल्याचा आरोप तिने केला आणि ते वेगळ्या मजल्यावर राहत असल्याचा दावा देखील तिनं केला आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये कंगणानं  चित्रपटाच्या घोषणेबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या एका कपलविषयी सांगितले आहे. तिने या पोस्ट मध्ये म्हटले आहे कि, 'एका बातमीनुसार  वेगवेगळ्या मजल्यांवर राहणारे आणि चित्रपटाच्या घोषणांसाठी फक्त जोडपे असल्याचे दाखवणाऱ्या खोट्या पती-पत्नीचे जोडपे खोट्या बातम्या पसरवत आहेत. अलीकडे पत्नी आणि मुलगीही कौटुंबिक सहलीत दिसले नाही. तिचा नवरा मला मेसेज करून त्याला भेटण्याची भीक मागत होतात. या बोगस जोडप्याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे. जेव्हा आपण प्रेमासाठी नाही तर पैसा आणि कामासाठी लग्न करतो तेव्हा असेच घडते. माफिया डॅडीच्या दबावाखाली पापाकी परीशी लग्न केले, कारण त्या बदल्यात त्याला चित्रपटाच्या ट्रीलॉजिचं वचन दिले. आता या खोट्या लग्नातून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यानं आपल्या पत्नी आणि मुलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा भारत आहे, इथे लग्न झालं की झालं. त्यातून सुटका नाही.''

Kangana Ranaut shares post and attacks alia bhatt and ranbir kapoor calls marriage is fake

कंगनानं तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्टर शेअर केलं. तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगितल्यानंतर कंगनानं एका फेक कपलीची वरील पोस्ट शेअर केली. कंगनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की कंगनानं ही पोस्ट रणवीर, आलिया आणि त्यांची लेक राहासाठी केली होती. कारण रणवीर सध्या लंडनमध्ये असून तिथे त्याची आई नीतू कपूर आणि कुटुंबासोबत आईचा वाढदिवस साजरा करत आहे. तर आलिया आणि राहा हे दोघे भारतात आहेत. 

Kangana Ranaut shares post and attacks alia bhatt and ranbir kapoor calls marriage is fake

हेही वाचा : बॉलिवूडमध्ये वादग्रस्त ठरलेल्या Kiss चे फोटो समोर, 7 वा फोटो पाहून बसेल धक्का...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

=

या पोस्टरमध्ये दोन चेहरे, एक कॅसेट आणि एकमेकांना जोडलेली बंदूक दाखवण्यात आली होती. तिने कॅप्शन मध्ये म्हटलं की "आणि... अॅक्शन! अहिंसा एंटरटेनमेंट आणि ट्रायडेंट आर्ट्स सोबत एका मेगा प्रोजेक्टवर काम करत आहे, यात नॉर्थ आणि साऊथ भारतीय चित्रपटसृष्टीतील एक शक्तिशाली जोडी एकत्र आणत अॅक्शन-पॅक चित्रपट तयार करत आहेत. लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपट कोणते कलाकार असतील याविषयी तुम्हाला काय वाटतं?