'तिला 52 सर्जरी कराव्या लागल्या...', Kangana Ranaut नं शेअर केला 16 वर्षे जुना अनुभव

Kangana Ranaut नं सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Dec 15, 2022, 05:57 PM IST
'तिला 52 सर्जरी कराव्या लागल्या...', Kangana Ranaut नं शेअर केला 16 वर्षे जुना अनुभव title=

Kangana Ranaut On Delhi Acid Attack : दिल्लीतील द्वारका परिसरात 17 वर्षीय तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. ही मुलगी घरी परतत असताना तिच्यावर हा हल्ला करण्यात आला. ज्या मुलानं तिच्यावर हल्ला केला तो मुलगा आणि ती आधीपासून एकमेकांना ओळखत होते. काही दिवसांपूर्वीचा त्यांचं ब्रेकअप झालं होतं. दरम्यान, त्या मुलीनं असं कसं केलं हा प्रश्न त्या मुलाला होता आणि याचा सूड उगवण्यासाठी मुलाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. सध्या या मुलीवर उपचार सुरु आहेत. या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय त्या मुलीचा चेहरा भाजला असून तिला डोळेही उघडता येत नसल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut ) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या बहिणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याविषयी सांगितले. 

 

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. 'मी तरुण असताना माझी बहीण रंगोली चंदेलवर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रोमियोने अॅसिड हल्ला केला होता. तिला 52 शस्त्रक्रिया, कोणी समजू शकत नाही इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला होता. त्या प्रकरणानंतर आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. मी स्वत: थेरपीसाठी जायचे, कारण मला असं वाटयचं की गाडी किंवा बाईकवरून कोणी अनोळखी व्यक्ती माझ्यावर अॅसिड टाकेल. मी माझा चेहरा हा नेहमी झाकून ठेवायचे.'

Kangana Ranaut Reaction On Delhi Acid Attack Remember s Her Sister Rangoli Chandel Incident

हेही वाचा : Junk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण

कंगना पुढे म्हणाली की, 'हे अत्याचारी अजूनही थांबलेले नाहीत. सरकारने या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अ‍ॅसिड हल्लेखोरांविरुद्ध कठोर पावले उचलली जावीत, मी गौतम गंभीरशी सहमत आहे.' भाजप खासदार गौतम गंभीरनं या प्रकरणावर एक मोठं विधान केलं आहे की, ज्यात मुलीवर अॅसिड फेकणाऱ्या गुन्हेगारांना जाहीर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. 

रंगोली आणि कंगनाच्या कुटुंबाला झाल्या होत्या प्रचंड वेदना 

रंगोली चंदेल ही अॅसिड हल्ल्यातून बचावलेली आहे. ती कंगनाची मॅनेजरही आहे. 5 ऑक्टोबर 2006 रोजी रंगोळीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, तिच्या घराजवळ राहणारा एक मुलगा तिच्यावर प्रेम करायचा. अॅसिड हल्ल्यात रंगोलीला एक कान गमवावा लागला. त्यांची एका डोळ्यातील दृष्टी ९० टक्क्यांपर्यंत गेली. स्तनावरही परिणाम झाला. त्याला जेवायलाही त्रास होत होता. त्यांना पाहताच अनेक पालक बाहेर बेशुद्ध पडले. तिने ज्या मुलाशी लग्न केले होते त्या मुलाने अॅसिड हल्ल्यानंतर संबंध तोडले होते. रांगोळीने तीन महिने आरशाकडे पाहिलेही नव्हते. 2017 मध्ये त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.