कान्समध्ये होणार कंगनाची एन्ट्री... ऐश्वर्या-सोनमला धडकी

अनेक कन्टोवर्सी आणि भांडणानंतर फायनली कंगणाला ती संधी मिळालीचं ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती...

Updated: May 4, 2018, 11:31 PM IST
कान्समध्ये होणार कंगनाची एन्ट्री... ऐश्वर्या-सोनमला धडकी  title=

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत यावर्षी कान्समध्ये आपला जलवा दाखवणार आहे... त्याची जोरदार तयारी कंगनानं सुरु केलीय. अनेक कन्टोवर्सी आणि भांडणानंतर फायनली कंगणाला ती संधी मिळालीचं ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती... आता कंगणा बॉलिवूडच्या बाकी टॉप अॅक्ट्रेसला तगडी टक्कर देण्यास सज्ज झालीय. यंदा कान्स फिल्म फेस्टिवल ८ मे ते १९ मे रंगणार आहे... यंदा या फिल्म फेस्टिवलमध्ये सोनम कपूर, दीपिका पादूकोन, ऐश्वर्या राय यांच्या बरोबर कंगनाही पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत पहिलांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर चालणारे..आपल्या ड्रेसिंग सेन्सने नेहमीच चर्चेत राहणारी कंगना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर कोणता लुक करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलयं..

कंगणाची कान्सची तयारी तर पूर्ण झालीय. कंगणा आपल्या सिनेमांमार्फंत दुसऱ्या अॅक्ट्रेसला नेहमीच तगडी स्पर्धा देत आलीय. त्यामुळे कान्समध्येही ती इतर अॅक्ट्रेसला तगडी टक्कर देईल यात शंका नाही.

ऐश्वर्या यावर्षी सतराव्या वेळा कान्सच्या रेड कार्पेटवर चालणारे... तर दुसरीकडे लग्नानंतर सोनमसाठी हा फिल्म फेस्टीव्हलसुद्धा खास असणार आहे. पण, सध्या तरी सगळे कंगणाच्या धमाक्याची वाट बघत आहेत. त्यामुळे कंगना कान्समध्ये काय जलवा दाखवते हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल...