आणखी एक प्रकरण कंगनावर शेकलं; पाहा बॉलिवूडच्या क्वीनवर ही काय वेळ आली

कंगना रानौत आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते.

Updated: Dec 23, 2021, 04:17 PM IST
आणखी एक प्रकरण कंगनावर शेकलं; पाहा बॉलिवूडच्या क्वीनवर ही काय वेळ आली title=

मुंबई : कंगना रानौत आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखली जाते. मात्र कित्येकवेळी असंही काही बोलून गेली आहे की, ज्यामुळे तिला अनेकदा कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागतं. शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून ते शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करण तिला महागात पडलं आहे. गुरुवारी खार पोलिस स्टेशनमध्ये आपली जबानी  नोंदवण्यासाठी कंगानाला हजर रहावं लागलं.

कंगना रानौतने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना 'खलिस्तानी' म्हटलं होतं. यानंतर काही शिख संघटनांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कंगनाला याच प्रकरणात तिचा जबाब नोंदवण्यासाठी बुधवारी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

मनजिंदर सिंग सिरसा यांच्या नेतृत्वाखालील शीख संघटनेने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कंगना रानौतने शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानीशी केली असून हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा दावा संघटनेने आपल्या तक्रारीत केला होता.

यापूर्वी कंगनाच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं होतं की, कंगना 22 डिसेंबरला खार पोलीस ठाण्यात हजर होईल. बुधवारी तिच्या वकिलांनी कंगनाला पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. 

कंगना रनौतच्या वकिलांनी सांगितलं की, 'उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही तपास अधिकाऱ्यांकडे पुढील तारीख मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही. त्यांनी माझ्या कोणत्याही मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद दिला नाही. आता माझे क्लाईंट उपलब्ध होताच त्यांच्याशी संपर्क साधतील. अधिकाऱ्यांनी आम्हाला पुढची तारीख दिली नाही. तर हायकोर्ट पुढच्या तारखेला निर्णय घेतील.