'आई होणं खूप सुखद अनुभव आहे, पण...' आई झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री

आई होणं फार कठीण असतं.

Updated: May 8, 2021, 02:34 PM IST
'आई होणं खूप सुखद अनुभव आहे, पण...' आई झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री  title=

मुंबई :  अभिनेत्री कल्कीने केक्ला रोखठोकपणे मत मांडत आपल्या मतावर ठाम असते. गेल्या वर्षी ७ फेब्रवारीला गोंडस मुलीची आई झाली. आई होणं ही एक अतिशन सुंदर भावना आणि अनुभव आहे. असं आपण नेहमीचं ऐकतो. पण कल्की आई झाल्यानंतर  डिप्रेशनमध्ये होती. आई होणं फार कठीण असतं. गरोदरपणात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. पण यावर कधी चर्चा केली जात नाही, मोकळेपणाने बोललं जात नाही. पण कल्कीने तिचा अनुभव एका मुलाखतीत शेअर केला. 

कल्की म्हणाली, 'माझ्या गरोदरपणातले अनुभव आयुष्यातले अविस्मरणीय क्षण म्हणून मी कधीच पाहत नाही. ती एक छोटी सुरूवात होती. गरोदरपणात  येणाऱ्या अनुभवांवर फार कमी लोक आहेत जे मोकळेपणाने बोलतात. आपण फक्त ऐवढचं ऐकलं आहे की आई होणं खूप सुखद अनुभव असतो. खरंच अनुभव सुखद आहे..'

पुढे कल्की म्हणाली, 'पण या काळात शारीरिक आणि मानसिक परिवर्तन घडून येतात, हे ही पाहणं गरजेचं आहे.  लोक असं समजतता की जर तुम्ही आई होण्याचा कटू अनुभव सांगितला तर तो तुम्हाला तुमच्या बाळापासून दुर करू शकतो.' असं देखील कल्की म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

यासर्व गोष्टींची सुरूवात कशी झाली, हे सुद्धा तिने सांगितलं. 'या सगळ्यांची सुरवात जेव्हा मला उलट्या सुरू झाल्या तेव्हापासून झाली. माझ्यातली उर्जा संपत आहे, असं मला वाटतं होतं. यादरम्यान कोणताच विचार मी करू शकत नव्हते. स्वतःच्या शरीराची चीड येवू लागली. करण फार थकवा जाणवत होता.'

यावेळी डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा देखील कल्कीने केला, 'मी पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना केलेला आहे. जेव्हा एखाद्याला  प्रत्येक दोन तासांनी जाग येत असेल, संपूर्ण रात्र झोप लागत नसेल तर तो डिप्रेशनमध्ये असतो. झोप न येणं हे खूप त्रासदायक असतं.' असं देखील कल्कीने उघडपणे सांगितलं. 

कल्कीने केक्ला हिने गेल्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा साथीदार Guy Hershberg यांच्या जीवनात या मुलीच्या निमित्ताने जणू आनंदाचीच उधळण झाली. कल्कीने सॅफो असं नाव ठेवत तिच्या मुलीला नवी ओळख दिली.