शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, फोटो ठरतोय चर्चेचा विषय

 कल्कि कोचलिनचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 7, 2022, 08:07 PM IST
शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, फोटो ठरतोय चर्चेचा विषय  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कल्कि ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच कल्कीनं एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याबरोबरच काम करणाऱ्या महिलांचे काय होत असेल याची कल्पना येते.कल्की कोचलिननं असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला सर्व काही समजेल आणि नोकरी करणाऱ्या आईबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल.

कल्कीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. कल्कीला स्वतःच्या अटींवर आयुष्य कसे जगायचे हे माहित आहे. महिलांशी संबंधीत प्रत्येक मुद्यांवर ती मोकळेपणानं बोलते. तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक मेसेज देखील आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जुना फोटो शेअर करत कल्कीने तिच्या वेदना व्यक्त केल्या

कल्कीनं फॅन्ससोबत थ्रो-बॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या मेकअप रूममध्ये दिसत आहे. शूटिंग सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू आहे. या फोटोमध्ये  कल्की खुर्चीवर बसली आहे. ती तिची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. आता पर्यंत सर्व काही सामान्य आहे, परंतु जर आपण फोटोकडे लक्षपूर्वक पाहिले तर ती ब्रेस्‍ट पंपद्वारे ब्रेस्‍टमिल्क काढताना दिसते. 

कल्कीच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तिला खंबीर आई म्हटलं आहे. खरंच ही फक्त एक झलक आहे. नोकरी करणाऱ्या आईचे आयुष्य खूप आव्हानात्मक असते. मुलाला योग्य वेळ न देण्याचा अपराध खूप वेदनादायक असतो. कॅप्शनमध्ये 'मॉम्स गिल्ट' असे लिहून कल्कीने तिची खंतही व्यक्त केली आहे.

अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्की तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपल्या मुलीचे नाव सॅफो ठेवले आहे आणि अनेकदा तिचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ब्रेस्ट पंपमुळे तिला किती त्रास सहन करावा लागला हेही कल्कीनं यापूर्वी सांगितले आहे.