मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री कल्कि कोचलिन (Kalki Koechlin) आई झाली आहे. कल्किने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 7 फेब्रुवारी रोजी कल्किने गोव्यात मुलीला जन्म दिला आहे. बॉयफ्रेंड Guy Hershberg च्या बाळाला कल्किने जन्म दिला आहे.
कल्कि आणि गाय गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. कल्किने लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यापासून ती आणखी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कल्किने आपण बाळाला वॉटर बर्थ देणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे तिने गोव्यात बाळाला जन्म दिला आहे. महत्वाचं म्हणजे कल्किचा जन्म देखील गोव्यात झाला होता.
कल्किने आपल्या गरोदरपणाची बातमी कुणापासूनही लपून ठेवली नाही. कल्कि कायमच आपल्या बेबी बम्बचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. कल्किचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग हा शास्त्रीय पियानोवादक आहे.
कल्किच्या बाळाची बातमी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यावरून ही बातमी सगळ्यांना समजली.
2009 मध्ये 'देव डी' सिनेमाच्या माध्यामातून कल्किने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कल्कि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पहिली पत्नी आहे. कल्किने 30 एप्रिल 2011 मध्ये अनुराग कश्यपसोबत उटीमध्ये लग्न केलं होतं.