DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही...

पाहा कशी दिसते काजोलची लाडकी बहिण छुटकी...

Updated: Oct 20, 2022, 02:24 PM IST
DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही... title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. कधी कधी तर गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षक विसरतात. मात्र, सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक छाप सोडून जातील असं नाही. असाच एक चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. हा चित्रपट म्हणजे शाहरूख खान आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चित्रपटगृहात सर्वाधिक काळ चाललेला हा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटात काजोलची बहिणी म्हणजे छुटकीची तर सगळ्यांच्याच लक्षात आहे. छुटकीची भूमिका ही पूजा रुपारेलनं साकारही होती. आता पूजाचा लूक प्रचंड बदलला आहे. 

हेही वाचा : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चं वर्चस्व, कमाईच्या रेसमध्ये 'या' चित्रपटांना टाकलं मागे

या चित्रपटातली छुटकी आता खूप मोठी झाली असून आता ती 41 वर्षांची आहे. 27 वर्षांपूर्वी पूजानं राजेश्वरी उर्फ ​​चुटकी ही भूमिका साकारली होती. पूजा आजकाल चित्रपटांमध्ये तितकी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. तिच्याकडे केवळ अभिनय कौशल्य नाही तर ती एक अभिनेत्री तसेच गायिका, विनोदी कलाकार आणि पटकथा लेखक देखील आहे. एवढेच नाही तर तिने आयकिडो मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतले आहे. आता पूजा कशी दिसते पाहा...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर

पूजा रुपारेलनं एका मुलाखतीत सांगितलं की, तिला चित्रपटांमध्ये फारसा रस नाही, त्यामुळेच ती इतर कामांमध्ये व्यस्त असते. त्याचबरोबर तिच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे पूजा ही प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची चुलत बहीण आहे. सोनाक्षी आई आणि पूजाची आई बहिणी आहेत.