Lust Stories 2 : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोलला या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या चित्रपटात खूप बोल्ड कंटेट आहे. तर कलाकारांना या बोल्ड भूमिकांमध्ये पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चित्रपटातील बोल्ड कंटेटवर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. इतकंच काय तर त्यावरून कलाकारांना ट्रोल करण्यात आलं आहे. हा चित्रपट उद्या 29 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीत कशा प्रकारे बदल झाला आहे. त्यासोबत आधीच्या तुलनेत गोष्टींमध्ये कसा बदल झाला आहे याविषयी सांगितले.
एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, फीमेल प्लेजरला नॉर्मलाइज करायला हवं. कारण हे आमच्या आयुष्यातील एक साधारण गोष्ट आहे. ती म्हणाली, "एक अशी वेळ होती जेव्हा आम्ही यावर जास्त बोलत नव्हतो. त्यानंतर आम्ही याविषयी बोलायचे बंद केलं. पण काहीही झालं तरी हे आपल्या आयुष्यातील एक भाग आहे आणि आपण याशिवाय राहू शकत नाही. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आपण ड्रिंकिंग आणि खाण्याला नॉर्मलाइज केलं आहे त्याप्रमाणे या गोष्टीला आपण नॉर्मलाइज करायला हवं. ही गोष्ट आपण एकमेकांशी बोलू शकणारा एक मुद्दा ठरू शकतो. या गोष्टीवर काहीही न बोलणं म्हणजे अशा मुद्यांना अजून प्रोत्साहन देते. त्यामुळेच लोकांचे यावर थोडे जास्त लक्ष केंद्रित होते."
काजोल म्हणाली, "आधी चित्रपटांमध्ये लस्ट म्हटल्यावर असं होतं की दोन फूल एकमेकांजवळ येतात. दोन गुलाबाची फूल एकमेकांजवळ आणली जायची आणि बसं झालं. त्यानंतर महिला प्रेग्नंट होते. तर मला वाटतं की आता आपण खूप पुढे आलो आहोत आणि लस्ट स्टोरीज 2 सारखं काही बनवण्याविषयी विचार केला. मला असं वाटतं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो."
काजोल पुढे म्हणाली, "मला वाटतं नाही की प्रेम हे अमर असतं याविषयावर आजचं जग विश्वास ठेवतं. कोणाला कोणासाठी मरायचे नाही. आजकाल लोक एका पेक्षा जास्त साथीदार असण्यावर विश्वास करतात. आजपर्यंत आम्ही जितक्या लव्ह स्टोरी बनवल्या आहेत, त्या सगळ्या एका वेगळ्या पद्धतीनं बनवण्यात आल्या आहेत. त्या स्टोरी या मैत्री, मॉर्डन रिलेशनशिप्स आणि सोसायटीवर आधारीत होत्या."
हेही वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 72 Hoorain चा ट्रेलर प्रदर्शित!
'लस्ट स्टोरीज 2' मध्ये काजोलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, अमृता सुभाष, अंगद बेदी आणि मृणाल ठाकुर आहेत. तर या सगळ्यांच्या एक वेगवेगळ्या पटकथा आहेत. काजोलच्या पटकथेत कुमुद तिच्या पतीच्या भूमिकेत दाखवले आहेत. तर त्यांच्या पटकथेचे दिग्दर्शन हे अमित आर शर्मा यांनी केले आहे.