Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) काल दुसरा दिवस होता. (NMACC) यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि तिची लेक न्यासा देवगण. न्यासा ही नेहमीच चर्चेत असणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. काजोल आणि न्यासाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत न्यासा कॅमेऱ्यासमोर कशी आई काजोलसोबत वागते हे पाहायला मिळत आहे. त्या दोघींचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरु केलं आहे. (Kajol and Nysa)
काजोल आणि न्यासाचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओत काजोलनं पांढऱ्या रंगाचा डिझायनर इंडियन ड्रेस परिधान केला आहे. तर न्यासानं तिची कर्व्ही फिगर दाखवत शिमरी ड्रेस परिधान केला आहे. सुरुवातीला काजोल आणि न्यासा एकत्र पोज देताना दिसतात. तर काही क्षणातच न्यासा ही पुढे निघून जात असताना काजोल तिला हात धरते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण असं न करता न्यासा काजोलला काही सांगते आणि तिचा सोडून पुढे निघून जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. न्यासा या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. ते पाहता काही नेटकऱ्यांना दीपिका पदुकोणच्या कान्सच्या लूकची आठवण आली. दीपिकानं कान्समध्ये काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.
न्यासा आणि काजोलच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, न्यासा म्हणत असेल मला पार्टीत जायचं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, आताच्या मुलांना आई-वडिलांसोबत फोटो काढण्याची इच्छा नसते. तिसरा नेटकरी म्हणाला, आजकालची मुलं सगळ्यांसमोर आई-वडिलांचा अनादर करतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, ती नेहमीच तिच्या आईसोबत सगळ्यांसमोर असचं वागते. तर काही नेटकऱ्यांनी काजोलची पर्स ओपन आहे असे म्हटलं आहे. तर एक म्हणाला काजोल ही इतर भारतीय आईसारखी आहे. मुलगी सुंदर दिसत असेल तर तिला आणखी फोटो काढायला सांगते आणि चांगले फोटो आले तर लग्नाची वेळ येईल तेव्हा दाखवता येतील.
दरम्यान, न्यासाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत न्यासा आणि काजोल हे रेखा यांच्यासोबत दिसले. या व्हिडीओत न्यासा आणि काजोल रेखा यांच्यासोबत पोज देताना दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तर यांच्याशिवाय अनेक हॉलिवूड कलाकारांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. यात स्पायडर-मॅन फेम अभिनेता टॉम हॉलंट त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जेंडीया आणि सुपरमॉडेल गीगी हदिदनं हजेरी लावली होती.