काजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?

Nysa Devgn: नीसा देवगणचं नाव सतत वेगवेगळ्या मुलांसोबत जोडण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का नीसाचं नाव आता एका बिझनेसमॅनशी जोडण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरु झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2023, 04:48 PM IST
काजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?   title=
(Photo Credit : Social Media)

Nysa Devgn: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक नीसा देवगण ही सध्या सतत चर्चेत असलेली स्टार किड आहे. नीसानं अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसला तरी सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. नीसा ही सतत अनेक मित्र-मैत्रिणींसोबत दिसून येते. त्यामुळे बऱ्याचवेळा तिचे नाव हे मुलांसोबत जोडण्यात येते. चला तर जाणून घेऊया काय आहेत. नीसाच्या मित्रांच्या यादीत Orhan Awatramani उर्फ ओरी आणि वेदांत महाजन यांची नाव आहेत. कारण नीसा त्या दोघांसोबत सतत स्पॉट करण्यात येते. त्यांच्यासोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे आता अशी चर्चा सुरु आहे की नीसा ही वेदांत महाजनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे वेदांत...

कोण आहे वेदांत महाजन ?

वेदांत हा 25 वर्षांचा आहे. तर वेदांत हा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा को-ओनर आहे. हा मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये मोठ्या मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करतो. एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, वेदांतनं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर वेदांतच्या कार्यक्रमांमध्ये रणवीर सिंग, कनिका कपूरसारखे कलाकारा परफॉर्म करतात. 

काय करते नीसा

नीसा देवगण आता 20 वर्षांची आहे. तिनं सिंगापुरच्या United College of Southeast Asia तून शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती स्विट्झरलॅंडच्या Glion Institute of Higher Education मधून इंटरनॅश्नल हॉस्पिटॅलिटीचा कोर्स करताना दिसत आहे. नीसा ही एक ग्लॅमरस स्टार किड असून तिच्या खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. 

हेही वाचा : एकदोन नव्हे, तब्बल 28 वर्षे लहान मुलीला Nawazuddin Siddiqui नं Kiss करताच व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, अजय देवगण आणि काजोल यांनी त्यांची लेक नीसा देवगणला मिळत असलेल्या सगळ्या अटेन्शन आणि चर्चेच्या कारणामुळे चर्चेत राहते. दरम्यान, मुलीला मिळत असलेल्या लाइमलाइटवर अजय देवगण फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "या गोष्टीचा मला खूप त्रास होतो कारण आपण त्याला बदलू शकत नाही. तुम्हाला खरंच कळत नाही की काय करायला हवं. कारण जास्त प्रमाणात त्या गोष्टींबद्दल लिहिले जाते ज्या खऱ्या नसतात. पण जर तुम्ही त्याच गोष्टीवर रिएक्ट करतात तर ती गोष्ट गरज नसताना जास्त वाढते. यामुळे खूप विचित्र परिस्थिती निर्माण होते.