मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडतात. ज्यांच्या आठवणींची चर्चा कायम खास क्षणी होते. काही आठवणी मनाला आनंद देणाऱ्या असतात. तर काही मात्र फक्त वेदना. दिग्गज अभिनेते कबीर बेदी यांनी 'Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor' हे पुस्तक लाँच केलं आहे. या पुस्तकात त्यांनी एका अभिनेत्याचं आयुष्य कसं असतं, याबद्दल लेखन केलं आहे. शिवाय त्यांनी स्वतःच्या जीवनात आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांचा अनूभव देखील शेअर केले आहेत.
कबीर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या आत्महत्येबद्दलही सांगितलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव सिद्धार्थ होतं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याने आपला जीवन प्रवास संपवलवा. त्याच्याबद्दल बोलताना कबीर म्हणाले, 'तो अत्यंत हुशार होता. तो त्याच्या क्षमतेबद्दल अगदी अद्वितीय होता आणि मग एक दिवस अचानक त्याला गोष्टींचा विचार करता येत नव्हता.'
'मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला काय त्रास होतोय जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. एक दिवस त्याला रस्त्यावर रागात पाहिलं. तेव्हा त्याला सांभाळायला 8 पोलीस पुढे धावून आले. उपचार सुरू केले. तेव्हा त्याला सीजोफ्रेनिया झाल्याचं कळालं. अफाट प्रयत्न करून देखील तो मला सोडून गेला. दूर जाण्याचा निर्णय त्याचा होता. आणी तो गेला...' असं कबीर यांनी मुलाखतीत सांगितलं.