सत्य घटनेवर आधारित जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाचं कथानक दिल्लीतील सत्य घटनेवर आधारित आहे

Updated: Jul 6, 2019, 06:07 PM IST
सत्य घटनेवर आधारित जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा टीझर प्रदर्शित title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी 'बाटला हाऊस' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. २६ सेकंद असलेला हा टीझर २००८ मधील बाटला हाऊस या सत्य घटनेवर आधारित आहे. टीझरमध्ये काही बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजासह काही सीन दाखवण्यात आले आहेत.

चित्रपटाचा टीझर शेअर करत जॉनने '११ वर्षांनंतरही बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज कानात गुंजत आहे. बाटला हाऊस सत्य घटनेवर आधारित असल्याचं' त्याने म्हटलं आहे. 'बाटला हाऊस'चा ट्रेलर १० जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 
 
 
 

A post shared by John Abraham (@thejohnabraham) on

जॉनने टीझर रिलीज करत सोशल मीडियावर चित्रपटाचं एक पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये 'एक घर आयडेंन्टिफाय हुआ, एक साजिश रची गई, एक फर्जी एन्काउन्टर की' असं लिहिलं आहे. 'और इस एन्काउन्टर से शुरु हुआ बाटला हाऊस इन्व्हेस्टिगेशन' असं म्हणत जॉनने पोस्टर शेअर केलं आहे.

'बाटला हाऊस'मध्ये जॉन अब्राहमसह मृणाल ठाकूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय रवि किशन, प्रकाश राज, मनीष चौधरीही चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग दिल्ली, मुंबई, जयपूर आणि नेपाळमध्ये करण्यात आलं आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाऊस' येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

१५ ऑगस्ट रोजी केवळ 'बाटला हाऊस'च नाही तर आणखी दोन बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' आणि अक्षय कुमारचा 'मिशन मंगल'ही १५ ऑगस्ट याच दिवशी रिलीज होणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक कोणत्या चित्रपटला पसंती दर्शवतात आणि बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.