बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या निधनाला 10 वर्षे झाली असून त्या प्रकरणात आता निर्णय समोर आला आहे. मुंबईच्या स्पेषशल सीबीआयई कोर्टानं सूरज पांचोलीला निर्दोष म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयानं सूरज पांचोलीची आई आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे. तर या सगळ्या प्रकरणात जियाचा आईचं म्हणणं आहे की त्या आता हायकोर्टात जाणार आहे. दुसरीकडे अभिनेता सूरज पांचोलीनं कोर्टानं दिलेल्या या निर्णयानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सूरजनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सूरजनं सत्याचा कायम विजय होतो, असं म्हटलं आहे. तर त्यासोबत सूरजनं गॉड इज ग्रेट हे हॅशटॅग देखील वापरलं आहे. सूरजची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कारण 2013 साली जियानं गळफास घेत आत्महत्या केली होती तर त्याच्या तब्बल 10 वर्षांनी आता त्यावर निर्णय सुनावण्यात आला आहे.
राबिया यांनी कोर्टाच्या या निर्णयावर मीडियाशी बोलताना सांगितले की त्यांनी अजून हार मानली नाही. याविषयी बोलताना राबिया म्हणाल्या, अखेरचा न्याय अजून झालेला नाही. पुराव्याअभावी हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआयनं त्यांचं काम नीट केलं नाही. माझी मुलगी कशी मेली हा प्रश्न मी अजून परत विचारणार आहे. कारण त्या मागचं सत्य अजून समोर आलेलं नाही. आता मी या प्रकरणात उच्च न्यायालयात जाणार आहे.
सूरज पांचोलीला न्यायालयात सुनावनीसाठी बोलवण्यात आलं तेव्हा त्याच्यासोबत त्याची आई जरीना वहाब देखील पोहोचल्या होत्या. त्यानंतर आज 12 वाजता जिया खान प्रकरणात निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : जिया खान मृत्यू प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
जिया खाननं वयाच्या 25 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी जिया खान ही तिच्या करिअरमध्ये खूप चांगल काम करत होती. जिया खाननं घेतलेल्या या निर्णयानं अनेकांना मोठा धक्काबसला होता. जियानं तो पर्यंत 3 चित्रपट केले होते. जिया खाननं बॉलिवूडचे दिग्ग्ज अभिनेता अमिताभ बच्चनच्या निशब्द या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर जिया हाऊसफूल आणि गजनी या चित्रपटात दिसली होती. जियाला गजनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ओळख मिळाली होती. करिअरमध्ये अनेक गोष्टी करण्याची इच्छा असणाऱ्या जिया खाननं कमी वयात इतका मोठा निर्णय घेतला होता.