बॉलिवूड अभिनेत्रीचा हात धरत सेलिब्रिटी पतीचं तिसरं लग्न; इथं दुसऱ्या पत्नीची वाईट अवस्था

तिथं तो मात्र नव्या आणि आंददायी आयुष्याची सुरुवात करण्यात रमला होता. 

Updated: Jun 10, 2022, 12:14 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीचा हात धरत सेलिब्रिटी पतीचं तिसरं लग्न; इथं दुसऱ्या पत्नीची वाईट अवस्था  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : खरं प्रेम सहजासहजी मिळत नाही असं म्हणतात. मुद्दा असा, की खऱ्या प्रेमासाठी तुम्हाला शोधमोहिमही राबवावी लागत नाही. नियतीमध्ये असल्यास कधी नकळत तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. पण, खऱ्या प्रेमाच्या बाबतीत सर्वांचं नशीब चांगलं असतं असं म्हणणं योग्य नसेल. 

कारण कलाजगतामध्ये किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही काही अशी उदाहरणं आहेत, ज्यांना प्रेमाला मुकावं लागलं आहे. कलाजगतातील एक लोकप्रिय अभिनेत्रीही त्यापैकीच एक. 

'दिल मिल गए' या मालिकेतून ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाजत असताना ऑफस्क्रिनही प्रेमाचा बहर अनुभवणारी ही जोडी होती, अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि अभनेता करण सिंग ग्रोवर याची. (Jennifer Winget was broke after her divorce with Actor Karan sing grover)

करण आणि जेनिफरमध्ये मैत्री झाली, पुढे या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्या दोघांनी लग्नही करण्याचा निर्णय घेतला. हे करणचं दुसरं लग्न होतं. करणसोबतचं जेनिफरचं लग्न फार काळ टिकलं नाही. 

Karan Singh Grover first 'Likes' and then 'Unlikes' ex wife Jennifer  Winget's Instagram pic

अवघ्या दोन वर्षांतच या नात्याला तडा गेला. घटस्फोटानंतर आपण पूर्णपणे कोलमडून गेल्याचं जेनिफरनं हल्लीच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'त्यावेळी मी सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. माझ्या घटस्फोटाची बातमी  व्हायरल झाली होती. लोक माझ्या आणि त्याच्याबद्दल वाईटसाईट लिहित होते. माझ्यासाठी ते अतिशय तणावपूर्ण होतं. मी पुरती तुटले होते. हे सर्व का होतंय मला कळतच नव्हतं', असं ती म्हणाली. 

काम ही एकच गोष्ट होती जी मला या साऱ्यातून बाहेर काढू शकेल असं ती म्हणाली. कामाच्याच माध्यमातून ती या संकटातून बाहेर पडू शकली. 

इथे जेनिफर या परिस्थितीशी झुंज देत असताना तिथे करणनं अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न होतं. करणचं पहिलं लग्न श्रद्धा निगम हिच्यासोबत झालं होतं. पण, पहिल्या दोन्ही लग्नांचं नातं त्याला टिकवता आलं नाही. आता मात्र तो बिपाशासोबत संसारात रमला असल्याचं स्पष्ट होत आहे.