Takeshi's Castle पुन्हा येतोय! दिल्लीचा 29 वर्षीय युट्यूबर जावेद जाफरीच्या जागी, कोण आहे तो?

Javed Jaffrey Replaced by Bhuvan Bam in Takeshi's Castle Reboot: सध्या चर्चा आहे ती म्हणजे टकेशीज कासल या शोची. हा शो पुन्हा येतो आहे परंतु यावेळी जावेद जाफरी आपल्याला कॉमेट्री करताना दिसणार नाहीत. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 14, 2023, 01:46 PM IST
Takeshi's Castle पुन्हा येतोय! दिल्लीचा 29 वर्षीय युट्यूबर जावेद जाफरीच्या जागी, कोण आहे तो? title=
Javed Jafri Replaced by Bhuvan Bam in Takeshis Castle Reboot latest entertainment breaking news

Takeshi's Castle: आपल्या लहानपणीचे कार्टुन्स हे आपल्या आजही लक्षात आहेत. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली असते. आजही हे कार्टून्स पाहायला आपल्याला आवडतात. तुम्हाला आठवतच असेल की लहानपणी एक शो लागायचा आणि तो म्हणजे टकेशिज कासल. हा शो तेव्हा प्रचंड लोकप्रिय होता. घरोघरी हा जपानचा शो लोकप्रिय होता. यावेळी या शोमधून विविध गेम्स खेळले जायचे. त्यातून हे गेम्स पाहताना आपल्याला प्रचंड आनंद व्हायचा, आपण सगळेच हा शो एन्जॉय करायचो. त्यातून तेव्हा आजच्यासारखे ओटीटी नसल्यानं तेव्हा आपण सर्वच जण टीव्हीसमोर बसून हा शो पाहायचो.

त्यात एक वेगळीच गंमत होती. त्यामुळे हा शो आपण पाहयचोच पाहयचो. या शोला व्हॉईस ओव्हर असायचा तो म्हणजे अभिनेते जावेद जाफरी यांचा. त्यामुळे हा शो चांगलाच लोकप्रिय ठरला होता. त्यांची कॉमेडी कॉमेट्री आपल्या सर्वांनाच आवडायची. त्यामुळे त्यांचीही तेव्हा लोकप्रिय अफाट होती.

हेही वाचा : मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार; मद्याच्या आहारी, कारकिर्दीची राखरांगोळी अन् मग....

परंतु आता हा शो नव्या रूपात समोर येताना यावेळी मात्र जावेद जाफरी यांच्याऐवजी युट्यूबर भुवन बाम दिसणार आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी भुवननं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं या शोचे पोस्टर शेअर केले आहे. हा शो यावेळी अॅमेझॉन प्राईमला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या भुवनला सगळेच शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी जावेद जाफरी नाही म्हणून अनेक प्रेक्षक हे नाराजही झाले आहेत. त्यातून सध्या यामुळे सोशल मीडियावर जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्हाला नक्की कोणाला ऐकायला आवडेल भुवन बाम की जावेद जाफरी? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

BB Ki Vines यातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे. सोबतची त्याची नेटवर्थ ही 122 कोटी रूपये आहे. त्यांचे युट्यूबवरही 4.7 मिलियन हून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे भुवन बामची सर्वत्र क्रेझ असते. यावेळीही त्याची जोरात क्रेझ आहे. 100 स्पर्धक यावेळी यात सहभागी होतील. तेव्हा लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकताही ही शिगेला गेली आहे. यावेळी नक्की भुवन बाम आपलं या माध्यमातून किती मनोरंजन करणार हे येत्या काळात कळेलच.