फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला रेखा यांनी लगावली कानशिलात! VIDEO समोर

Rekha Viral Video : रेखा यांनी चाहत्याला कानशिलात लगावल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 14, 2023, 12:50 PM IST
फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला रेखा यांनी लगावली कानशिलात! VIDEO समोर title=
(Photo Credit : Social Media)

Rekha Viral Video : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा जिथे ही जातात तिथे त्यांचे चाहते त्यांच्या आजुबाजूला गर्दी करताना आपण पाहतो. रेखा यांना पाहिल्यानंतर कोणीही बोलू शकत नाही की त्यांचं वय 68 वर्षांच्या आहेत. त्या नेहमीच त्यांच्य चाहत्यांशी प्रेमानं वागत असल्याचे आपण पाहतो. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, रेखा यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्या त्यांच्याच हटके स्टाईलमध्ये दिसल्या. रेखा यांना पाहताच त्यांचे चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगेच धावत आले. प्रत्येकाला रेखा यांच्यासोबत एकतरी फोटो हवा होता. या सगळ्यात रेखा यांनी एका चाहत्याच्या कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळत आहे. पण रेखा यांनी प्रेमानं कानशिलात लगावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

काल म्हणजे 13 सप्टेंबर रोजी झालेल्या एका अवॉर्ड शोमध्ये रेखा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रणदीप हुड्डा, मनीष मल्होत्रा, रवीना टंडन, वाणी कपूर, जिया शंकर आणि जरीन खान देखील पाहायला मिळत होते. मात्र, रेखा यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत रेखा यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी एका चाहत्यानं त्यांना थांबवलं रेखा थांबल्या सगळ्यात आधी तर त्यांनी कानशिलात लगावण्याचा इशारा केला, त्यानंतर त्यांना त्या चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवत फोटो काढला आणि मग प्रेमानं कानशिलात लगावली. इतकंच नाही तर हसत त्या तिथून निघून गेल्या. मग काय रेखा या व्हिडीओत पापाराझींसाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसल्या आहेत. रेखा यांना पुन्हा एकदा पाहुन त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : फडणवीस की अजितदादा? उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकूण बसेल धक्का

रेखा यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'इन आंखोकी मस्ती के मस्ताने हजारो है!' दुसरा नेटकरी 'आजच्या काळातील रेखा ही वेगळीच आहे.' रेखा यांच्या सुंदरतेची अनेकांनी स्तुकी केली आहे. रेखा यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या 2014 सालीच चित्रपटसृष्टी पासून लांब झाल्या. दरम्यान, 2023 मध्ये त्या 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या.