जसलीन मॉलमध्ये झाडू मारते तेव्हा...

जसलीन मथारूच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत असतात. 

Updated: Nov 4, 2019, 05:25 PM IST
जसलीन मॉलमध्ये झाडू मारते तेव्हा... title=

मुंबई : 'बिग बॉस' फेम जसलीन मथारूच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत असतात. सध्या तिच्यावर मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ आली आहे. मॉलमध्ये झाडू मारत असल्याचा तिचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द जसलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Jhadu lagana koi mujse seekhe #Broomingtutorials

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'झाड़ू लगाना कोई मुझसे सीखे.' असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये ती झाडू मारताना दिसत आहे. तर ती स्वत:च्या घरासाठी झाडू खरेदी करत आहे. त्यामुळे ती कोणता झाडू चांगला आहे. त्याची तपासणी करत आहे. 

जसलीन आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आता दोघे चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचं वास्तव रूप जगासमोर येणार आहे.