अभिनेत्रीचं व्हाट्सऍप हॅक, येत आहेत अश्लील व्हिडिओ कॉल

शूटिंगमध्ये व्यस्त असताना त्याने तेजस्वीला व्हि़डिओ कॉल केला होता.

Updated: Nov 4, 2019, 04:34 PM IST
अभिनेत्रीचं व्हाट्सऍप हॅक, येत आहेत अश्लील व्हिडिओ कॉल  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा व्हाट्सऍप अकाउंट हॅक करण्यात आला आहे. खुद्द तेजस्वीने याविषयी माहिती दिली आहे. माझ्या व्हाट्सऍप अकाउंटचा वापर करून हॅकर अश्लिल व्हिडिओ कॉल करत असल्याचे तिने सांगीतले आहे. यापूर्वी देखील अनेक सेलेब्रिटींचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करण्यात आले होते. आता तसाच प्रकार तेजस्वी प्रकाशसोबत घडला आहे. 

स्पॉटबॉयसोबत संवाद सांधताना तिने सांगीतले की, 'ज्या व्यक्तीने माझं अकाउंट हॅक केलं आहे. तो व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमधील लोकांसोबत सांवाद साधत आहे. त्याचप्रमाणे त्यांना देखील व्हिडिओ कॉल करत आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Caption this...

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash) on

शूटिंगमध्ये व्यस्त असताना त्याने तेजस्वीला व्हि़डिओ कॉल केला होता. तर त्या व्हिडिओमध्ये एक नग्न अवस्थेतील पुरूष समोर उभा असल्याचं तिने सांगीतले आहे. शिवाय कलाविश्वातील तेजश्रीच्या अनेक मित्रमंडळींना देखील त्याने अश्लिल कॉल केले आहेत. 

त्यानंतर तिने सायबर सेलला कॉल देखील केला. परंतु त्यांनी तिला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मी तक्रार दाखल करू शकले नाही, पण मी लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचं तिने सांगीतले आहे.