'I Love You' जान्हवी कपूरची पोस्ट व्हायरल

श्रीदेवी यांच्या मृत्युला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.   

Updated: Feb 24, 2021, 02:46 PM IST
'I Love You' जान्हवी कपूरची पोस्ट व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आज तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पुण्यतिथी निमित्त जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने श्रीदेवी यांच्या पुण्यतिथी निमित्त एक पोस्ट शेअर केलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्याप्रती प्रेम दर्शवणाऱ्या पोस्ट्सचा, संदेशांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ट्विटरवर तर #shridevi हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे. त्याचप्रमाणे जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने पोस्टमध्ये एक चिठ्ठी  शेअर केली आहे. या चिठ्ठीमध्ये “I love you my labbu…You are the best baby in the world” असा मजकूर लिहीला आहे. या फोटोवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत.

24 फेब्रुवारी 2018 साली श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. जेव्हा श्रीदेवी यांचं निधन झालं तेव्हा जान्हवी ‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधीच श्रीदेवींचं निधन झालं. वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या मृत्युला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.