बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Nov 12, 2023, 01:15 PM IST
बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का title=
(Photo Credit : Social Media)

Janhvi Kapoor Saree Price : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी सध्या अनेक सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावताना दिसते. अशात तिचा एक लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी जान्हवीनं नेसलेल्या साडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या साधारण दिसणाऱ्या साडीची किंमत ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. याा फोटोत जान्हवीनं जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीत जान्हवी खूप सुंदर दिसत असून तिच्या मेकअपनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र, चर्चा ही जान्हवीच्या साडीच्या किंमतीची आहे. जान्हवीनं परिधान केलेली ही साडी फॅशन डिझायनरल अर्पिता मेहतानं डिझाईन केलेली आहे. जान्हवीची ही साधारण दिसणारी साडी तब्बल 95 हजारांची आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीची एथनिक स्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तिच्या लूक्ससोबत नेहमीच ती एक्सपेरिमेंट करताना दिसते. खरंतर जान्हवीचे वेस्टर्न पेक्षा ट्रेडिशन्ल लूक्समध्ये सगळ्यात जास्त दिसते. तिचे हे लूक्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरात. तिच्या लूक्सची एक खासियत म्हणजे ती व्हायब्रेंट कलर जास्त परिधान करते. 

Janhvi Kapoor s saree Price is the talk of the town know what is the cost

दरम्यान, एका मुलाखतीत जान्हवीनं तिच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तिनं सांगितलं होतं की तिची आई श्रीदेवीनं त्यांना सगळ्या परंपरांविषयी सांगितलं होतं. दिवाळीच्या निमित्तानं श्रीदेवी यांना घराची सजावट करायला खूप आवडायचं. तर श्रीदेवी आणि कपूर कुटुंबातील इतर महिला एकत्र दिवाळी साजरी करायच्या. यानिमित्तानं श्रीदेवी या पारंपारिक रेशमची साडी नेसायच्या. तर जान्हवी आणि खुशीला पट्टू पावदाई सेट असायचे. 

हेही वाचा : Tiger 3 X Review : सलमानच्या 'टायगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो पाहताच प्रेक्षकांनी केली प्राण्यांशी तुलना

जान्हवीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'मिस्टर एंड मिसेज माही' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक स्पोर्ट्स कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात जान्हवी ही राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय जान्हवी लवकरच जूनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'देवारा' या चित्रपटात ते दोघं दिसणार आहेत. या चित्रपटातून जान्हवी तेलुगु चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. तर तिचा हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.