बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूर पोहचली देवदर्शनाला; व्हिडीओ व्हायरल

यावेळी अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर तिच्या बॉयफ्रेंडसोबत देव दर्शनाला गेल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा मंदिरातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Updated: Aug 28, 2023, 06:50 PM IST
बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूर पोहचली देवदर्शनाला; व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. जान्हवीच्या पर्सनल आयुष्याविषयी कायमच वेग-वेगळ्या अफवा उडत असतात. मात्र यावेळी अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत देव दर्शनाला गेल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा मंदिरातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

जान्हवीच्या या व्हिडीओत अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया दिसत आहे. ही जोडी दर्शनासाठी तिरुपती बालाजीला पोहचली आहे. या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, ती सदमा सिनेमामधील श्रीदेवीसारखी दिसते!!! तर अजून एकाने लिहीलंय, ती खराब मूडमध्ये दिसत आहे. तर अजून एकाने लिहीलंय, कोण म्हणेल ती दिग्गज अभिनेत्रीची मुलगी आहे जिने अनेक शस्त्रक्रियांनंतरही इतकी सामान्य प्लास्टिकची बाहुलीसारखी दिसते. तर एकाने लिहीलंय, आता आम्हाला एवढंच बघायचं बाकी राहिलेलं. तर अजून एकाने म्हटलंय, कोण आहे हा? तर अनेकजण तिला आईसारखी दिसतेस अशा कमेंट्स करत आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलाची चर्चा असते. कधी पार्टींमुळे तर कधी बिकनी फोटोंमुळे ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगतेय आणि यावेळी कारण ठरलंय ते तिच्या रिलेशनशिपचं. जान्हवी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांचा तिरुपती बालाजीचं दर्शन (Tirupati Balaji) करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी आणि शिखरचा तिरुपती बालाजी दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत जान्हवी ट्रेडिशनल लूकमध्ये (Treditional Look) दिसत आहे. तीने दाक्षिणात्या पारंपारिक पेहराव परिधान केला आहे तर शिखर पहाडियानेही देखील पारंपारिक धोतर आणि उपरणं परिधान केलेलं दिसत आहे.