Vogueच्या कव्हर पेजवर जान्हवी कपूर, पाहा फोटोज

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, करण जोहरची निर्मिती असलेल्या धडक या सिनेमातून एंट्री करतेय.

Updated: May 30, 2018, 03:30 PM IST
Vogueच्या कव्हर पेजवर जान्हवी कपूर, पाहा फोटोज title=

मुंबई : बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, करण जोहरची निर्मिती असलेल्या धडक या सिनेमातून एंट्री करतेय. श्रीदेवींच्या निधनानंतर ती फार कमी वेळा मीडियासमोर आली. मात्र आता जान्हवी लवकरच वोग्यूच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. हे जान्हवीचे पहिले मॅगॅझिन फोटोशूट आहे. यासोबतच जान्हवीने या मॅगॅझिनला पहिला इंटरव्‍ह्यूही दिला. धर्मा प्रॉडक्शनने वोग्यूसाठी केलेल्या जान्हवी कपूरच्या फोटोशूटचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोजमध्ये जान्हवी सुंदर दिसतेय. जान्हवीने कव्हर पेजवरील आपला फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केलाय. यात तिचा जबरदस्त लूक पाहून तिचे चाहते नक्कीच खुश होतील. यासोबतच तिची तुलना श्रीदेवींशीही केली जातेय.

 

जान्हवी कपूर धडक या सिनेमाद्वारे बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक आहे.