मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.
आज तिच्या सैराट रिमेकच्या म्हणजे 'धडक' या सिनेमाचे शूटींग सुरू झाले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत जान्हवी दिसणार आहे. गुरूवारपासून उदयपूर येथे ‘धडक’चे शूटींग सुरु झाले. पण शूटींगच्या पहिल्याच दिवशी श्रीदेवीच्या लेकीला दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या संतापाचा सामना करावा लागला. अगदी सिनेमाच्या पहिल्याच दिवशी दिग्दर्शक भडकला आहे.
फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा याने ‘धडक’च्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी व ईशांत दोघेही दिग्दर्शकासमोर घाबरलेले दिसत आहेत. शशांक कुठल्या तरी गोष्टीवरून जान्हवी व ईशांत दोघांनाही रागवतोयं,असे या फोटोत दिसते. आणि या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
पण थांबा, ही चर्चा भडकलेल्या पोझची नाही तर या फोटोसोबतच्या हॅशटॅगची आहे. प्रत्यक्षात ईशांत, जान्हवी, शशांक खेतान सगळेच सेटवर मौज मज्जा करत आहेत. तिघांनीही मनीष मल्होत्राला जाणीवपूर्वक ही ‘फन पोज’ दिली आहे.
The journey of #DHADAK begins today!! JAHNVI and ISHAAN .....@ShashankKhaitan pic.twitter.com/RZ9LaxeCBn
— Karan Johar (@karanjohar) December 1, 2017
धर्मा प्रॉडक्शननेही शूटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर केला आहे. मुहूर्ताच्या या शॉटमध्ये ईशान ब्ल्यू शर्ट व ग्रे पॅन्टमध्ये दिसतोय तर जान्हवी पिंक कलरच्या सूटमध्ये दिसतेय. उदयपूरच्या एका तलावाच्या किनारी या दोघांनी पाठमोरी पोज दिली आहे. यात दोघांचाही चेहरा दिसत नाही. पण ‘परफेक्ट शॉट ’ असे मात्र हा फोटो पाहून वाटतेय.