मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत अनेक अभिनेत्रींच नाव जोडल जात, पण एक नाव अस आहे, जे अनेक वर्षांपासून त्याच्याशी जोडल गेलय. ते नाव म्हणजे त्याची रशियन गर्लफ्रेंड यूलिया वंतूर. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र रंगताना दिसतात. यूलिया आज तिचा ३९वा वाढदिवस मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसादिवशी सलमानने सुद्धा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सलमानने यूलियाला चक्क हिऱ्याची अंगठी भेट स्वरूपात दिली आहे. सलमानची आई सलमाने त्याला अंगठी भेट म्हणूण यूलिया देण्याचा सल्ला दिला. यूलिया खान कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असते. वाढदिवस साजरा करत असतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, यूलिया बॉलिवूडमध्ये गायन क्षेत्रात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. यूलियाने 'रेस ३', 'सुल्तान', 'जीनियस', 'विरे दी वेडींग', आणि 'ओ तेरी' या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. सलमान-यूलियाच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. मात्र सलमान-यूलियाने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.