राम जेठमलानी यांच्यावर येणार बायोपीक

ज्येष्ठ वकील आणि ख्यातनाम कायदेपंडीत राम जेठमलानी यांना कोण नाही ओळखत. देशातील दिग्गज वकीलांपैकी एक असलेले हे एक प्रमुख व्यक्तिमत्व. आजवर या कायदेपंडीताने न्यायालयात अनेक खटले लढले आणि जिंकले आहेत. त्यांची एकूण कारकीर्दही तितकीच संघर्षमय आहे. त्यामुळे राम जेठमलांनी यांची संघर्षगाथा बायोपीकच्या रूपात भव्य पडद्यावर झळकणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 26, 2017, 08:11 PM IST
राम जेठमलानी यांच्यावर येणार बायोपीक title=

मुंबई : ज्येष्ठ वकील आणि ख्यातनाम कायदेपंडीत राम जेठमलानी यांना कोण नाही ओळखत. देशातील दिग्गज वकीलांपैकी एक असलेले हे एक प्रमुख व्यक्तिमत्व. आजवर या कायदेपंडीताने न्यायालयात अनेक खटले लढले आणि जिंकले आहेत. त्यांची एकूण कारकीर्दही तितकीच संघर्षमय आहे. त्यामुळे राम जेठमलांनी यांची संघर्षगाथा बायोपीकच्या रूपात भव्य पडद्यावर झळकणार आहे.

कोण करणार जेठमलांनींची भूमिका

राम जेठमलानी सध्या 94 वर्षांचे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रदीर्घ काळ कायदे, समाज, राजकारण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या व्यक्तिमत्त्वावर बायोपीक आले तर त्याचे स्वागतच होणार आहे. या बायोपीकमध्ये अभिनेता कुणाल खेमू राम जेठमलानी यांची भूमिका साकारणार आहे. तर, सोहा अली खान आणि कुनाल, रोनी स्क्रवाला हे या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या करत आहेत.

जेठमलानी यांचे मत काय?

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटनिर्मात्यांनी म्हटले आहे की, जेठमलानी यांनी आपल्या आयुष्याची कहाणी भव्य पडद्यावर साखारण्यासाठी मान्यता दिली आहे. या चित्रपटात जेठमलानी यांच्या आयुष्यातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पैलूंवर भाष्य केले जाणार आहे. विशेष असे की, जेठमलानी यांचे व्यक्तिगत आयुष्यही बरेच चर्चित राहिले आहे. 

कुणाल खेमूची प्रतिक्रीया

जेठमलानी यांच्या बायोपीकबाबत बोलताना कुणाल खेमू म्हणाला, मला वाटते की, जेठमलानी यांची कहणी लोकांपर्यंत पोहोचने गरजेचे आहे. कारण, 94 वर्षांच्या जेठमलानी यांनी तब्बल 70 वर्षे वकीली केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग आणि किस्से अत्यंत मनोरंजक आणि तितकेच महत्त्वाचे आहेत. मी त्यांच्यावर लिहीण्यात आलेली सर्व पुस्तके वाचली आहेत. त्यांची भूमिका साकारने ही माझ्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

अनेक वादग्रस्त प्रकरणात लढले खटले

राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांची हत्या करणाऱ्या आरोपींपासून ते चारा घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यांपर्यंत अनेक खटले लढले आहेत. याशिवाय ते संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरू ते सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी अमित शाह यांचाही खटला लढला आहे.