Salman Khan : बॉलिवूडचा दबंग खान अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनेकांसाठी तर, सलमान म्हणजे त्यांच्या घरातील एक सदस्य ठरला. बऱ्याच नवख्या कलाकारांना बी- टाऊनमध्ये नवी ओळख देण्यासाठी नावाजलेल्या सलमानला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र काही बाबतीत कमनशिबी दिसला. त्यातलीच एक बाब म्हणजे सलमानचं लग्न. (Salman Khan Movies)
काहींशी सलमानच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या, तर काहींनी त्याच्या लग्नावर लक्ष केंद्रीत केलं. काहीजण तर म्हणाले, पत्रिका छापलेल्या असतानाही सलमानचं लग्न झालेलं नाही. बरं, यामध्ये सलमानचं लग्न झालंय त्याची मुलगी आणि पत्नीही दुबईमध्ये असं म्हणणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. (Salman Khan wedding)
बसला ना धक्का? (Salman Khan wife and 17 Years old Daughter in Dubai) सलमानला 17 वर्षांची मुलगी आहे हे ऐकून तुम्हाला विश्वास बसेल का? या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
त्याचं झालं असं, की सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळींनी एखादी पोस्ट केल्यावर त्यावर टीका करणारे कमी नसतात. ते अशा काही टीका करतात, की पाहणारेही हैराणच होतात. सलमानच्या बाबतीतही असंच घडलं. (Entertainmnent news)
(Arbaz Khan) अरबाज खान च्या 'पिंच 2' (Pinch 2), या टॉक शोमध्ये सलमान आला आणि त्यानं यासंदर्भातील खुलासा केला होता. एका ट्रोलरच्या कमेंटवर व्यक्त होत सलमाननं आपलं लग्न झालंय की नाही यावर वक्तव्य केलं.
'कुठे लपून बसला आहेस? इथे (भारतात) सगळ्यांना माहिताये की तू तुझ्या पत्नी आणि 17 वर्षांच्या मुलीसह दुबईला (Dubai) आहेस. भारतीयांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार?', अशी एक कमेंट सोशल मीडियावर करण्यात आली होती.
सलमानची यावर काय प्रतिक्रिया?
सलमाननं या कमेंटवर प्रतिक्रिया देत, 'या सर्व अफवा असल्याचं म्हणत सर्वांनाच माहितीये की माजं लग्न झालेलं नाही. गेल्या 9 वर्षांपासून मी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो', असं तो म्हणाला.
सलमानच्या लग्नाभोवती असंख्य चर्चा होत असतात, त्याच्या पत्नीविषयीची चर्चा त्यापैकीच एक.