मुंबई : जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला एक हे जग, आपली माणसं सोडून जावचं लागतं. पण जाणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केलेली शेवटची कायम जवळच्या व्यक्तींच्या लक्षात राहते. सांगायचं झालं दोन वर्षांपासून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. बॉलिवूडने देखील अनेक दिग्गज कलाकारांना अखेरचा निर्णय घेतला. 29 एप्रिल रोजी अभिनेते इरफान खान यांचं निधन झालं. पण अद्यापही त्यांचा मुलगा बाबिल आणि पत्नी सुतापा इमरान यांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.
नुकताचं इरफान यांची पत्नी सुतापा यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इरफार यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले. त्यांनी सांगितलं की इरफान यांना त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक गाणी ऐकवली होती.'
त्या पुढे म्हणाल्या, 'झुला किने डाला रे', 'उमराव जान' चित्रपटातील गाणं 'अमरैया झूले मोरा सैयां लूं मैं बलइयां', 'लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो', 'आज जाने की जिद ना करो...' आणि रवींद्र संगीत. तेव्हा ते बेशुद्ध होते पण त्यांच्या डोळ्यांमधीन अश्रू वाहत होते....
सांगायचं झालं तर मृत्यूच्या आधी अनेक वर्ष इरफान Neuroendocrine tumour आजारावर उपचार घेत होते. पण आजाराशी लढताना त्यांचं निधन झालं. आज इरफान नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्यात आहेत.