मुंबई : २०२० या वर्षात रूळेपर्यंत संपूर्ण जगावर कोरोनाच सावट आलं. या कोरोनाशी लढत असतानाच बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली. अभिनेता इरफान खान आणि त्यापाठोपाठ अभिनेता ऋषी कपूर या दोन दिग्गज अभिनेत्यांनी दोन दिवसातंच जगाचा निरोप घेतला.
२९ एप्रिल २०२० रोजी इरफान खान यांनी ५३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तर ३० जानेवारी रोजी ऋषी कपूर यांनी ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या दोघांच्याही निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. दोघांच्याही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली.
या सगळ्यात आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे दोन्ही कलाकारांची जन्मतारीख आणि त्या मागचं गणित. ऋषी कपूर यांचा जन्म १९५३ साली झाला त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तर अभिनेता इरफान खान यांचा जन्म १९६७ साली झाला आणि त्यांच वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं. दोघांच्याही आयुष्यातील हे आकडे खूप काही सांगून जात आहेत.
दोन्ही कलाकारांच्या जन्माचं वर्ष, त्यांच आताचं वय हे २०२० सोबत जोडलं गेलं आहे. १९५३ + ६७ = २०२० आणि १९६७ + ५३ = २०२० ! तथापि, हादेखील एक योगायोग आहे. ऋषी कपूर आणि इरफान खान यांच निधन हे कर्करोगामुळे झालं आहे. दोघांनीही परदेशात जाऊन आपल्या आजारावर उपचार देखील घेतले. दोघंही २०१९मध्ये भारतात परतले होते. पण २०२० एप्रिलच्या अखेरीस यांच निधन झालं.