International Yoga Day निमीत्त नेहा धुपियाकडून योगा पोज शेअर; पाहून व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे.

Updated: Jun 21, 2022, 06:58 PM IST
International Yoga Day निमीत्त नेहा धुपियाकडून योगा पोज शेअर; पाहून व्हाल थक्क title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. तिला दोन मुली आहेत. प्रेग्नेंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे ती अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण ती मानसिकदृष्ट्या इतकी मजबूत आहे की तिला याची पर्वा नाही.

नेहा तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. तिला योगाची खूप आवड आहे. आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपली आवडती योगा पोझ शेअर करत आहे. यामध्ये बॉलिवूड-टीव्ही इंडस्ट्रीशी निगडित सेलेब्सही सहभागी होत आहेत. नेहाही या बाबतीत मागे कशी राहिल? तिने तिच्‍या आवडत्‍या योगा पोजही चाहत्‍यांसोबत शेअर केल्या आहेत. जे पाहून चाहते आश्‍चर्य व्‍यक्‍त करत आहेत.

शिर्षासन हे आवडतं आसन, वडिलांकडून शिकले
नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हेडस्टँड करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. ही एक अतिशय अवघड योगासन मुद्रा आहे. फोटोंमध्ये नेहा डोक्यावर उलटी उभी असलेली दिसत आहे. हे आसन केवळ  कठिण सरावानेच केलं जाऊ शकतं. ते बघून सामान्य माणूस चक्रावला पाहिजे. या फोटोंसोबत नेहाने लिहिलं आहे की, तिने हे आसन तिच्या वडिलांकडून शिकलं आहे आणि दररोज सराव करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहाचे हेडस्टँड करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनेही कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे. चित्रपटांपासून दूर असूनही नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. ती आपल्या मुलींसोबत अनेक सुंदर पोस्ट शेअर करत असते. तिच्या मुलीही तिला योगासनांमध्ये साथ देतात. याची झलक तिने फोटोंच्या माध्यमातून दाखवली आहे.