मुंबई : बॉलिवूडचे डिस्को नंबर्स आजही पब आणि बार्सच्या पार्टीची मजा वाढवतात. 70 ते 80 दशकातील डिस्कोवर नाचणारा अभिनेता मिथुन आजही लोकांना आठवतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, भारतात पॉप आणि डिस्को म्युझिकची सुरूवात कुणी केली?
बॉलिवूडमधील गोल्ड मॅन बप्पी लाहिरी ज्यांना आपण बप्पी दा या नावाने ओळखतो. त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये पॉप संगीताची सुरूवात केली. आज बप्पी दा यांचा 65 वा वाढदिवस आहे.
सोन्याचे दागिने आपल्यासाठी लकी मानणारे बप्पी दा यांचा आज 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकातामध्ये जन्म झाला. बप्पी दा 70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आले आणि 80 दशकात लोकप्रिय झाले. बप्पी दा यांचा जलवा थोडा कमी झाला पण त्यांच्या गाण्यावर आजही लोकं ठेका धरतात. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'डर्टी पिक्चर'मधील 'ऊ ला ला ऊ लाला...' सुपरहिट ठरला.
बप्पी दा यांचा प्रसिद्ध बंगाली गायक अपरेश लाहिरी आणि संगीतकार आई बांसरी लाहिरी यांच्या घरी झाला. बप्पी दा यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी संगीत शिकायला सुरूवात केली. आपल्या आई वडिलांकडून संगीत शिकून पहिल्यांदा बंगाली सिनेमात गाणं गायलं. बप्पी लाहिरी 19 वर्षांचे असताना त्यांनी कोलकाता सोडलं. 1973 साली 'नन्हा शिकारी' या सिनेमातील गाण्यांना संगीत देण्याची संधी मिळाली.
1975 मध्ये 'जख्मी' सिनेमात मोहम्मद रफी आणि किशोर कुमारसोबत बप्पी दा यांनी पहिलं गाणं गायलं. किशोर कुमारने बप्पी लाहिरींना बॉलिवूडमध्ये मदत केली. बप्पी दा यांनी चित्रानीसोबत 1977 मध्ये लग्न केलं.
बप्पी दा यांनी एका दिवसात सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम देखील रचला. बप्पी दा असे एकटे संगीतकार आहेत ज्यांना किंग ऑफ पॉप मायकल जॅक्शनने मुंबईत आयोजित केलेल्या पहिल्या शोला बोलावलं होतं. 1966 मध्ये हा लाइव्ह शो आयोजित करण्यात आला.