VIDEO : आनंदानं बेभान होत स्टेजवरच कोसळली 'मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल'

मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल २०१८ हा कार्यक्रम म्यानमारच्या यंगूनमध्ये आयोजित करण्यात आला होता

Updated: Nov 27, 2018, 09:10 AM IST
VIDEO : आनंदानं बेभान होत स्टेजवरच कोसळली 'मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल' title=

मुंबई : म्यानमारमध्ये नुकताच मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल २०१८ चा सहावा सीझन आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 'मिस ग्रॅन्ड पॅराग्वे' क्लारा सोसा हिनं हा खिताब जिंकला. परंतु, या सोहळ्यादरम्यान असा काही किस्सा घडला की तो सोशल मीडियावरही हीट ठरला. कार्यक्रमात आयोजकांनी मिस ग्रॅन्ड पॅराग्वे हिचं नाव विजेती म्हणून घोषित केलं... आणि क्लाराचा आनंद गगनात मावेनासा झाला... या आनंदाच्या भरात क्लारा स्टेजवरच मूर्च्छित होऊन कोसळली. सोशल मीडिया साईट फेसबुकवर या इव्हेंटचा एक व्हिडिओ तेजीनं व्हायरल होतोय. 

मिस ग्रॅन्ड इंटरनॅशनल २०१८ हा कार्यक्रम म्यानमारच्या यंगूनमध्ये आयोजित करण्यात आला होता. मिस ग्रॅन्ड पॅराग्वे आणि मिस ग्रॅन्ड इंडिया यांच्यादरम्यान हा मुकाबला होता... जसं विजेतीचं नाव घोषित करण्यात आलं.. तसं मिस ग्रॅन्ड पॅराग्वे क्लारा सोसा हिचं नाव घोषित करण्यात आलं... आणि क्लारा आनंदाच्या भरात स्टेजवरच कोसळली.

क्लारा सोसा हिला या स्पर्धेत भारताची मीनाक्षी चौधरी हिच्याकडून जोरदार टक्कर मिळाली. मीनाक्षी या स्पर्धेत फर्स्ट रनरअप ठरली. सेकंड स्टेजच्या स्विमसूट राऊंडनंतर क्वार्टर फायनलिस्टमधल्या १० जणांना पुढच्या राऊंडसाठी निवडण्यात आलं. यामध्ये मिस ग्रॅन्ड इंडिया मीनाक्षी चौधरी, मिस ग्रॅ्ड डोमिनिक रिपब्लिक, मिस ग्रॅन्ड पॅराग्वे, मिस ग्रॅन्ड मेक्सिको, मिस ग्रॅन्ड वेनेझुएला, मिस ग्रॅन्ड स्पेन, मिस ग्रॅन्ड प्युर्टो रिको, मिस ग्रॅन्ड इंडोनेशिया, मिस ग्रॅ्ड जपान आणि मिस ग्रॅन्ड वियतनाम यांचा समावेश होता.