Rito Riba च्या सुपरहिट Heer Ranjha गाण्याचा Video अखेर रिलीज; एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये दिसणारी 'ती'सुद्धा जिंकतेय मनं... Rito Riba नं पुन्हा घेतलाय काळजाचा ठाव.... इन्स्टा रीलसाठी एकदम परफेक्ट गाणं 

Updated: Oct 18, 2022, 03:32 PM IST
Rito Riba च्या सुपरहिट Heer Ranjha गाण्याचा Video अखेर रिलीज; एकदा पाहाच  title=
indion idol 13 fame Rito Riba Heer Ranjha Song Out watch video

Rito Riba Heer Ranjha Song Out: असं म्हणतात की, कोणाच्या नशीबाला कलाटणी मिळाली की त्याला थांबवणं कठीण होतं. प्रत्येकजण आयुष्यात अशाच एखाद्या घटनेच्या प्रतीक्षेत असतो जिथून त्यांचा पुढचा प्रवास सुकर आणि तितकाच हेवा वाटणारा असतो. सध्या जीवनाला मिळालेली हीच कलाटणी अनुभवतोय इंडियन आयडॉल (Indian Idol 13 ) फेम रिटो रिबा (Rito Riba). रिटो त्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे ज्याच्यावर खरंच दैवी शक्तींचा हात आहे. कलेच्या बळावर सध्या त्यानं भारतातील प्रत्येकालाच वेड लावलं आहे. सोशल मीडियामुळे तर, तो रातोरात स्टार झाला आहे. 

Indian Idol 13 मध्ये रिटोला फार पुढपर्यंतचा पल्ला गाठता आला नाही. पण, त्यानं तिथेच माघार पत्करली नाही. रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतरच त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. शोमध्ये रिटोचा प्रवास थांबला, पण कलेच्या बळावर त्याला नेटकऱ्यांनी मात्र स्वीकारलं. 

अधिक वाचा : कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का? 

थिएटर राऊंडमधून रिटो (Rito Riba) बाहेर पडला, पण त्यानं सादर केलेलं गाणं संगीतप्रेमींच्या आणि विशेष म्हणजे तरुणाईच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. 'हीर रांझा' नावाचं हे गाणं गाताना, जेव्हा रिटोनं सूर छेडले तेव्हा प्रत्येकालाच आपलं प्रेमाचं माणूस आठवलं. अगदी परीक्षकांमध्ये बसलेली नेहा कक्करही याला अपवाद ठरली नाही. 

गाणं सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांपर्यंत आलं आणि रील्सपासून स्टेटस आणि स्टोरीजपर्यंत सगळीकडेच रिटोचा आवाज कानी पडू लागला. हा गायक आहे तरी कोण याचाच शोध अनेकांनी घेतला. आता रिटो प्रसिद्धीच्या आणि यशाच्या आणखी एका टप्प्यावर पोहोचला आहे. कारण, त्याच्या या अतिप्रचंड प्रसिद्ध गाण्याचा ऑफिशियल व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. 

 

लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi joshi) हिनं गाण्याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअक करत चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. मुख्य म्हणजे ज्याची नेटकरी आतुरतेनं वाट पाहच होते ते गाणं इतक्या सुरेखपणे पाहायला मिळत असल्यामुळे नेटकऱ्यांनी, चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.