पवनदीपला सलमानकडून मोठी ऑफर, मिळालं हे सरप्राईज

 इंडियन आयडॉल 12 चा विजेता पवनदीपने या पार्टीची शोभा वाढवली. 

Updated: Aug 18, 2021, 12:53 PM IST
पवनदीपला सलमानकडून मोठी ऑफर, मिळालं हे सरप्राईज  title=

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकताच त्यांचा 63 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्यांनी एक खास पार्टीच आयोजन  केलं. ज्यात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान देखील उपस्थित होता.

त्याचबरोबर इंडियन आयडॉल 12 चा विजेता पवनदीपने या पार्टीची शोभा वाढवली. पवनदीप  सोबत, शोच्या इतर काही स्पर्धकांना या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आता पार्टीचे काही फोटो समोर आले आहे. ज्यात हे सर्व लोक सलमानसोबत सेल्फी  काढताना दिसत आहेत.

इंडियन आयडॉल 12 चा ग्रँड फिनाले 12 तास चालला. ज्यात पवनदीप राजन शोचा विजेता ठरला. नुकत्याच एका मुलाखतीत पवनदीपने खुलासा केला होता की तो  सलमान खानचा मोठा चाहता आहे. आणि मला त्याच्यासाठी चित्रपटात गाणे गायला आवडेल. तिथे वाढदिवसाच्या पार्टीबद्दल बोलताना सर्व स्पर्धकांनी सलमान  खानसोबत खूप मजा केली आणि फोटोही काढले.

पवनदीपने बोलून दाखवलेल्या सुप्त इच्छेमुळे सलमान खानसोबत तो लवकरच काम करु शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. सलमान देखील पवनदीपला त्याच्या  चित्रपटात गाण्याची ऑफर देऊ शकतो असं ही बोललं जातं आहे.