करण जोहर नाही तर ही व्यक्ती करणार शाहरूखच्या लेकीला बॉलिवूडमध्ये लाँच

शाहरूखच्या मुलीला रूपेरी पडद्यावर पाहाण्याची चाहत्यांची प्रतिक्षा संपणार 

Updated: Aug 18, 2021, 12:03 PM IST
करण जोहर नाही तर ही व्यक्ती करणार शाहरूखच्या लेकीला बॉलिवूडमध्ये लाँच  title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार किड्समध्ये शाहरूखच्या मुलीला अधिक पसंती आहे. सुहानाचे अनेक फॉलोअर्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सुहानाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. चाहते वाट पाहत आहेत की, किंग खानप्रमाणे सुहाना कधी पडद्यावर दिसणार? यावर शाहरूख खानने कायम गोपनियता ठेवली. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सुहाना लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  सुहानाला बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक करण जोहर नाही तर फिल्ममेकर झोया अख्तर लाँच करणार आहे. 

करण जोहर सुहानाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल अशी चर्चा होती पण आता ही जबाबदारी झोयाने तिच्या खांद्यावर घेतली आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, झोया अख्तर इंटरनॅशनल कॉमिक बूक आर्चीवर एक प्रोजेक्ट तयार करण्याच्या तयारीत आहे. झोयाचा नवा प्रोजेक्ट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

यासाठी सुहाना खानचं नाव फायनल करण्यात आलं आहे. सुहाना शिवाय या प्रोजेक्टमध्ये इंडस्ट्रीमधील आणखी दोघांना लाँच करण्यात येणार आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्री होण्याचं सुहानाचं स्वप्न लहानपणापासून होतं. तर शाहरूखचा मुलगा आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर एक फिल्ममेकर होण्याचे स्वप्न पाहात आहे. 

शाहरूखबद्दल सांगायचं झालं तर तो गेल्या काही दिवसांपासून रूपरी पडद्यावर दिसला नाही. 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. महत्त्वाचं म्हणजे शाहरूखचा 'झिरो' चित्रपट  प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला.  आता शाहरूख 'पठान' चित्रपटाच्यामाध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.