OSCARS 2019 : आता ऑस्करची 'पाळी', पुरस्कार सोहळ्यात भारताची अशी हजेरी

ऑस्करच्या व्यासपीठावर एका अर्थी ही भारताची हजेरीच 

Updated: Feb 25, 2019, 12:32 PM IST
OSCARS 2019 : आता ऑस्करची 'पाळी', पुरस्कार सोहळ्यात भारताची अशी हजेरी  title=

लॉस एंजेलिस : OSCARS 2019. भारतातील एका खेड्यातील प्रसंगांवर आधारित 'पिरियड- एण्ड ऑफ सेंटेन्स' या माहितीपटाला ९१ व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट  सब्जेक्ट) हा पुरस्कार मिळाला आहे. Rayka Zehtabchiने या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं असून, गुनित मोंगा यांच्या 'सिख्या एंटरटेंन्मेन्ट'कडून याची निर्मिती करण्यात आली आहे.

२५ मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीला साकारण्यास हातभार लावला आहे तो म्हणजे ऑकवूडच्या एका शाळेतील १२ विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका मेलिसा बर्टन यांनी. 'आज तक'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हा माहितीपट साकारला जाण्यामागेही एक रंजक कथा आहे. ज्यामध्ये ओकवूडच्या एका विद्ययार्थ्याने भारतीय खेड्यात मासिक पाळीविषयी फार माहिती नसल्याविषयीचं एका लेखात वाचलं होतं. ज्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधत त्यांची मदत घेत त्या गावात सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं एक यंत्र दिलं. ज्यानंतर त्या गावात जनजागृतीसाठी एका माहितीपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली. 

'Period. End of Sentence', या माहितीपटाच्या वाट्याला सध्या असंच यश आलं आहे. मासिक पाळी, त्याविषयीचे समजस गैरसमज आणि ग्रामीण भारतामध्ये असणारे त्याविषयीचे न्यूनगंड या साऱ्याभोवती हा माहितीपट फिरतो. त्यासोबतच प्रकाशझोत टाकतो तो म्हणते भारताच्या 'पॅडमॅन' म्हणजेच अरुणाचलम मुरुगानंदन यांच्या कामावर.  अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या या लघुपटाची यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील यश सध्या प्रशंसेच पात्र ठरत आहे. 

ऑस्करच्या व्यासपीठावर एका अर्थी ही भारताची हजेरीच होती. हाच आनंद व्यक्त करत गुनित मोंगा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आम्ही जिंकलो... असं लिहित पुरस्कार मिळाल्याचं जाहीर केलं. प्रत्येक मुलगी ही जणू एक देवीच आहे, ही लक्षवेधी बाबही त्यांनी मांडली. गुनित मोंगा, मोंगा 'सिख्या एंटरटेंमेन्ट'ने या माहितीपटाव्यतिरिक्त 'द लंचबॉक्स' आणि 'मसान' या चित्रपटांच्या निर्मितीतही योगदान दिलं होतं.