OSCARS 2019 : ऑस्कर विजेती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे...

And the award for Best actress goes to...

Updated: Feb 25, 2019, 11:23 AM IST
OSCARS 2019 : ऑस्कर विजेती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे... title=

लॉस एंजेलिस : कलाविश्वात सर्वात मानाचा मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक दिवसांपासून  OSCARS 2019 च्या सोहळ्याची चर्चा होती. अखेर आज बहुप्रतिक्षित ऑस्कर २०१९ सोहळा पार पडला. यावेळी विविध विभागातील नामांकनं जाहीर केली गेली. ऑस्कर २०१९ च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. ओलिविया कॉलमनची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून घोषणा करण्यात आली असून तिला ऑस्कर २०१९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 'द फेवरेट' या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिची निवड करण्यात आली.

ओलिविया कॉलमनने हा पुरस्कार पुन्हा-पुन्हा मिळत नाही. पुरस्कार घेताना ओलिविया अतिशय भावूक झाली होती. या पुरस्कारासाठी तिने पतीचे आभार मानले आहेत. या चित्रपटाच्या टीमचेही आभार मानले आहेत. 

२०१८ मध्ये 'THE FAVOURITE' या चित्रपटाची मोठी चर्चा होती. ४४ वर्षीय ओलिविया कॉलमने (olivia colman) या चित्रपटात फ्रेल क्विन अॅनी या महाराणीची भूमिका साकारली आहे. याआधी ७६व्या 'गोल्डन ग्लोब २०१९'च्या पुरस्कार सोहळ्यातही ओलिविया कॉलमने 'द फेवरेट' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला होता.