Prakash Raj on India -Bharat : सध्या देशात भारत विरुद्ध इंडिया यावरून गदारोळ सुरु आहे. या सगळ्यात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या जी 20 समिटमध्ये परदेशातील अनेक नेते देखील सहभागी होणार आहे. राजकारणी लोकांसोबतच सेलिब्रिटींना देखील जी 20 चे आमंत्रण पाठवण्यात येत आहे. पण सध्या वाद याच्यावरून सुरु आहे की आमंत्रण पत्रात प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटलं आहे. आमंत्रण पत्र पाहिल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी असं म्हणणं सुरु केलं आहे की केंद्र सरकारला देशाचे नाव इंडियाच्या जागी भारत करायचे आहे. त्यावर अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमिताभ यांच्यानंतर प्रकाश राज आता त्यांची या सगळ्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की 'तुम्ही घाबरून फक्त नाव बदलू शकतात... आम्ही भारतीय न घाबरता तुम्हाला आणि तुमच्या सरकारला बदलू शकतो. #इंडिया.'
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. अमिताभ बच्चन यांनी एक्स अकाऊंट म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी फक्त 'भारत माता की जय' असे म्हटले होते. अमिताभ यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अमिताभ देशाचं नाव बदलण्यासाठी त्यांची संमती देत असल्याचं म्हटलं आहे. खरंतर अमिताभ यांनी काहीही स्पष्ट न बोलता हे ट्वीट केल्यानं सगळ्यांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा : Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान
बॉलिवूड अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी देखील या प्रकरणात त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. या कार्यक्रमा दरम्यान, त्यांना इंडियाचं नाव भारत करण्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत जॉकी श्रॉफ म्हणाले की 'भारत बोलणं कोणतीही चुकीची गोष्ट नाही. इंडिया आहे तर इंडिया आहे. भारत आहे तर इंडिया आहे. माझं नावं जॅकी आहे. मला लोक जॉकी बोलतात, कोणी जॉकी बोलतं. माझ्या नावाला जसं पाहिजे तसं घेतात. पण मी बदलणार नाही. मी कसा बदलेन? नाव बदलणार आम्ही थोडी बदलणार. भारत भारत आहे.'