VIDEO : हृतिक रोशनची आई उत्तम डान्सर, मुलाला ही देतेय टक्कर

आपण अनेकदा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला जबरदस्त डान्स मूव्ह करताना पाहिले आहे.

Updated: Aug 31, 2021, 09:52 AM IST
VIDEO : हृतिक रोशनची आई उत्तम डान्सर, मुलाला ही देतेय टक्कर  title=

मुंबई : आपण अनेकदा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला जबरदस्त डान्स मूव्ह करताना पाहिले आहे. पण तुम्ही हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना नाचताना पाहिले आहे का? पिंकी रोशन यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या जिममध्ये जबरदस्त डान्स मूव्ह करताना दिसत आहे.

पिंकी रोशन यांचा डान्स व्हिडिओ

या वयातही त्या अगदी तंदुरुस्त आहेत. हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिंकी रोशन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्युली चित्रपटाच्या गाण्यावर त्यांनी ताल धरला आहे आणि पिंकी रोशन वर्कआउट करताना नाचत आहे. हृतिक रोशनला हा व्हिडिओ इतका आवडला की त्याने स्वतः त्यावर कमेंट करत प्रशंसा केली. या व्हिडिओमध्ये त्या डान्स वर्कआऊट करताना दिसत आहेत. गाण्यावर त्या वर्कआऊट करण्याचा आनंद लुटत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृतिकची स्पेशल कमेंट 

हृतिक रोशनने या व्हिडिओवर कमेंट केली, 'हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार आहे. संगीत तुम्हाला गमावणार आहे. 'दिल क्या करे जब किस को, किस से प्यार हो जाए' हे गाणे बॅकग्राऊडला वाजत आहे.  4 मिनिटांच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये पिंकी रोशन वर्कआउट आणि डान्स करताना दिसत आहे.