Hrithik Roshan ने पहिल्यांदा शेअर केला गर्लफ्रेंडचा 'तो' फोटो

घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशनच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री, फोटो शेअर करत म्हणाला...  

Updated: Feb 26, 2022, 12:04 PM IST
Hrithik Roshan ने पहिल्यांदा शेअर केला गर्लफ्रेंडचा 'तो' फोटो title=

मुंबई : सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आजादला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील  करण्यात आलं.  काहीदिवसांपूर्वी दोघांना एका हॉटेलमध्ये डेट करताना स्पॉट करण्यात आलं. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले. त्यानंतर रोशन कुटुंबाच्या फॅमिली फोटोमध्ये देखील सबा दिसली.

आता हृतिकने पहिल्यांदा सबा आजादचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये त्याने सबा टॅग देखील केलं. हृतिकने शेअर केलेला फोटो सबाचा खास इव्हेंट इलेक्ट्रो-फंक बँड मॅडबॉय/मिंकचा आहे. फोटोमध्ये सबासोबत अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा ईमाद शाह देखील आहे. 

Hrithik Roshan, Saba Azad

सबा आणि ईमादचा फोटो स्टोरीमध्ये शेअर करत सबा आणि ईमादला शुभेच्छा दिल्या आहेत. ईमाद सबाचा एक्स-बॉयफ्रेंड आहे. 2020 साली दोघे विभक्त झाले. ईमाद आणि सबा लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं देखील समोर आलं.

आता हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.